पुण्यातील महत्वाच्या रस्त्यांपैकी एक मानला जाणारा रस्ता म्हणजे लक्ष्मी रोड. कुठलीही गोष्ट हवी असल्यास पुणेकरांची पाऊले वळतात ती लक्ष्मी रोडकडे. अनेक लोकांच्या आठवणी आणि भावना या रस्त्याशी जोडल्या गेल्या आहेत. पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन व पुणे सराफ असोसिएशन यांच्यातर्फे लक्ष्मीरोड नामकरण होऊन १०१ वर्षे पूर्ण झाली आहे. त्यामुळे यंदा लक्ष्मीरोड, कुमठेकर रोड व बाजीराव रोड परिसर असा सुमारे ३ किमी रस्त्यावर विद्युत रोषणाई केली आहे. (Pune News)
लक्ष्मी रस्त्याला १०१ वर्ष पूर्ण झाल्यामुळे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते या रोषणाईचं उद्घाटन करण्यात आलं आहे.१०१ वर्षांनंतरही पुणेकरांना लक्ष्मी रोडचा लखलखाट पाहायला मिळत आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी पुणेकर लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून इथे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या अनेक आठवणी आहेत.
(हेही वाचा : Ind vs SA : भारतीय संघ दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यासाठी कोलकातामध्ये दाखल)
काळानुसार बाजारपेठ वाढत गेली असली तरीही लक्ष्मी रोडची क्रेझ कमी झालेली नाही. हा लक्ष्मी रोड म्हणजे पूर्व आणि पश्चिम पुणे आणि इथल्या वेगळ्या संस्कृतींना जोडणारा रस्ता मानला जातो. तर काही लोक म्हणतात की दगडूशेठ हलवाई यांच्या पत्नीचे नाव या रस्त्याला दिले गेले. हा लक्ष्मी रस्ता आता वाढत्या गर्दी आणि ट्रॅफिकमुळे काहीसा अपुरा पडायला लागला आहे. मात्र पुणेकरांचे प्रेम कमी झालेलं नाही आहे. पुणे बदलतं गेलं, त्यासह लक्ष्मी रस्ता बदलतं गेला आणि बाजारपेठ वाढत गेली. मात्र लक्ष्मी रोडवरची होणारी गर्दी काही केल्या कामी होत नाहीय कारण इथे येऊन खरेदी केल्या शिवाय खरेदी केल्यासारखं वाटतं नाही. कितीही ट्रॅफिक आणि गर्दी असली तरीही लक्ष्मी रोडला येऊन खरेदी केली जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community