-
सचिन धानजी,मुंबई
मुंबईतील हवेतील धुळीचे प्रमाण वाढल्याने ही प्रदुषित हवा नियंत्रित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्यावतीने ३० धुळ प्रतिबंधक यंत्र अर्थात एंटी स्मॉग मशीन्सची (Anti Smog Machine) खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याची निविदा अंतिम टप्प्यात आली असून कार्यादेश दिल्यानंतर पुढील १८० दिवसांमध्ये अर्थात तीन महिन्यांमध्ये ही यंत्र प्राप्त होऊन कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या दरम्यानच्या काळात महापालिकेच्यावतीने भाडेतत्वावर ही यंत्रे घेऊन स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २४ विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २४ मशीन्स भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. (Air Pollution In Mumbai)
मुंबईतील हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक धोरण जाहीर करतानाच महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी महापालिकेला धूळ प्रतिबंधक यंत्रे कार्यान्वित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. तसेचप्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र (Anti Smog Machine) बसवण्याचेही निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने ३० धूळ प्रतिबंधक यंत्र खरेदीचा निर्णय घेत यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली. ही निविदा अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु कार्यादेश बजावल्यानंतर १८० दिवसांच्या आतमध्ये या यंत्रांचा पुरवठा करावा अशाप्रकारची अट निविदेत आहे. त्यामुळे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी यासाठी अपेक्षित आहे. त्यामुळे सध्याच्या वाढत्या हवेतील प्रदुषणाचे प्रमाण पाहता महापालिकेने कायमस्वरुपी यंत्रे महापालिकेच्या ताब्यात येईपर्यंत भाडेतत्वावर अशाप्रकारच्या यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारची २४ यंत्रे ही भाडेतत्वावर घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Air Pollution In Mumbai)
(हेही वाचा – Pune News : पुण्याच्या ‘या’ रस्त्याला झाली १०१ वर्ष पूर्ण)
अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेच्यावतीने कायमस्वरुपी ३० धूळ प्रतिबंधक यंत्रे खरेदीची प्रक्रिया सुरु आहे, पण तोपर्यंत २४ विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २४ यंत्रे ही भाडे तत्वावर घेतली जाणार आहे. महापालिकेची कायमस्वरुपी यंत्रे ताब्यात येवून कार्यान्वित होईपर्यंत भाडेतत्वावरील यंत्रांचा वापर केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. (Air Pollution In Mumbai)
मुंबईतील प्रदूषण नियंत्रण कामांचा तसेच प्रगतिपथावर असलेल्या उपाययोजनांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी ३ नोव्हेंबर २०२३ सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, संबंधित खाते यांची व्यापक बैठक घेतली होती. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी, वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. परिणामी, हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. विशेषतः रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक दक्षतेने कामे करण्यात यावी. धूळ प्रतिबंधक यंत्र (Anti Smog Machine) वाहने अधिकाधिक संख्येने तैनात करावीत, अशाप्रकारचेही निर्देश दिले आहेत. (Air Pollution In Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community