Cabinet Expansion : ठरलं; ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार

येत्या ८ किंवा ९ नोव्हेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

134
Cabinet Expansion : सध्यातरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अधांतरीच

अजित पवार गटाला सत्तेत सामावून घेतल्यामुळे शिवसेना-भाजपातील आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. ती दूर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दमछाक होत असताना, राष्ट्रवादीतूनही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. त्यामुळे महायुतीमधील आमदारांचे रुसवे-फुगवे दूर करण्यासाठी येत्या ८ किंवा ९ नोव्हेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. (Cabinet Expansion)

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादीने धरला आहे. नव्या मंत्र्यांना अधिवेशनाची तयारी करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मिळावा, असा हेतू त्यामागे आहे. ही बाब लक्षात घेऊन दिवाळी आधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे निश्चित झाल्याचे कळते. सध्या राज्य मंत्रिमंडळात २९ मंत्री असून, १४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे भाजपा ६, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी ४ असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. त्यात शिवसेनेच्या कोट्यातून एका अपक्षाला संधी दिली जाणार आहे.

(हेही वाचा :Air Pollution In Mumbai : महापालिका भाडेतत्वावर घेणार धूळ प्रतिबंधक यंत्रे)

कुणाला मिळणार संधी?

– लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सर्व समाजघटकांना सत्तेत प्राधान्य दिले जाणार आहे. भाजपामधून संजय कुटे, माधुरी मिसाळ, राम शिंदे, प्रवीण दरेकर, किसन कथोरे, विजय देशमुख, जयकुमार रावल आदींची नावे चर्चेत आहेत.
– शिवसेनेतून बच्चू कडू, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि एका महिला आमदाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटातून मकरंद पाटील (वाई), दत्ता भरणे (इंदापूर), दिलीप मोहिते (खेड-आळंदी), तसेच मराठवाड्यातून सतीश चव्हाण किंवा प्रकाश सोळंके ही नावे चर्चेत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.