World Cup 2023 : बांगलादेशने प्रदूषणामुळे रद्द केला नवी दिल्लीतील सराव

भारताच्या मुख्य शहरांमधील प्रदूषण या विश्वचषक स्पर्धेत चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच आता बांगलादेश संघाला दिल्लीतलं आपलं सराव सत्रच रद्द करावं लागलंय.

140
World Cup 2023 : बांगलादेशने प्रदूषणामुळे रद्द केला नवी दिल्लीतील सराव
World Cup 2023 : बांगलादेशने प्रदूषणामुळे रद्द केला नवी दिल्लीतील सराव
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या मुख्य शहरांमधील प्रदूषण या विश्वचषक स्पर्धेत चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच आता बांगलादेश संघाला दिल्लीतलं आपलं सराव सत्रच रद्द करावं लागलंय. (World Cup 2023)

बांगलादेशचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाद झाला आहे. आता त्यांचा पुढील साखळी सामना नवी दिल्लीत होणार आहे. पण, तिथल्या हवेची ढासळलेली गुणवत्ता आणि वाढलेलं प्रदूषण यामुळे शुक्रवारी संघाला आपलं सराव सत्र रद्द करावं लागलं. (World Cup 2023)

शकीब अल हसनचा बांगलादेश संघ कोलकात इथं सामना खेळून बुधवारीच नवी दिल्लीत दाखल झाला होता. पाकबरोबरच्या पराभवानंतर संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे आणि त्यांचा पुढील सामना अरुण जेटली मैदानावर येत्या सोमवारी आहे. (World Cup 2023)

संघ मधले पाच दिवस दिल्लीत आहे आणि इथल्या दूषित हवेला संघ कंटाळलाय. दिल्लीची हवेची गुणवत्ता मागचे दोन दिवस खूपच ढासळली आहे आणि ‘व्हेरी सिव्हिअर’ या श्रेणीत ती पोहोचली आहे. त्यामुळे दृश्यता तर कमी झालीच आहे. शिवाय श्वास घेणंही कठीण झालं आहे. दिल्लीतील शाळांना गुरुवारी आणि शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (World Cup 2023)

(हेही वाचा – Shubman Gill Thanks Yuvraj Singh : शुभमन गिलने युवराज सिंगचे आभार का मानले?)

‘शुक्रवारचा सराव सत्र आम्ही रद्द केला. कारण, मागचे दोन दिवस खेळाडूंना घसा आणि छाती त्रास जाणवत आहे. गुरुवारी जे खेळाडू बाहेर फिरायला गेले होते, त्यांनीही तक्रार केली आहे. शिवाय सामन्यापूर्वी आणखी दोन सरावाचे दिवस आमच्या हातात आहेत. त्यामुळे हे सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला,’ असं संघाचे संचालक खलिद महमूद यांनी सांगितलं. (World Cup 2023)

श्रीलंकन संघ नुकताच भारताविरुद्ध मुंबईत खेळला आणि नवी दिल्लीत नुकताच पोहोचला असल्यामुळे त्यांचा सराव शनिवारीच सुरू होणार आहे. पण, यापूर्वी २०१७ मध्ये लंकन संघ थंडीत इथं खेळला तेव्हा त्यांनी मास्क लावणं पसंत केलं होतं. बांगलादेश संघ प्रशासनाने दिल्लीतील हवेविषयी नाराजी व्यक्त केली आहे आणि इथंच खेळावं लागेल का, असा सवालही पत्रकारांशी बोलताना विचारला. नवी दिल्लीत शेवटचा सामना ६ नोव्हेंबरला होणार आहे. (World Cup 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.