अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) ला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ललित पाटीलवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटीलला पळून जाण्यासंबंधी गंभीर आरोप ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर करण्यात येत आहे, मात्र डॉ. ठाकूर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. .
अधिष्ठाता कॉलेज आणि रूग्णालयाची देखरेख करण्याचे काम करतात. व्यवस्थापक, मेडिकल व्यवस्थापक यांचा पूर्ण रूग्णालयावर ताबा असतो. डॉक्टरांचे काम हे रुग्णावर उपचार करणे असते, Lalit Patil ला पळून जाण्यासाठी कोणत्याही डॉक्टरचा हात असेल, असे मला वाटत नाही. कोण काय बोलते, यावर भाष्य करू शकत नाही, असेही डॉ. ठाकूर म्हणाले.
ललित पाटील (Lalit Patil) सारखे असंख्य आरोपी आमच्याकडे येत असतात. माझ्यासह कुठल्याही डॉक्टरचा कधीही संबंध नव्हता आणि येणार नाही. आरोप करणाऱ्यांकडे पुरावा पाहिजे. मर्यादा असल्याने आम्ही बोलू शकत नाही. कुठल्याही रूग्णाला चांगले उपचार मिळाले पाहिजेत, हेच आमचे काम आहे. ललित पाटील (Lalit Patil) व्हीआयपी उपचार देण्यात आले नाही आणि त्यासाठी कुठल्याही राजकीय नेत्याने मला फोन केला नव्हता, रूग्णावर देखरेख करण्यासाठी नर्सेस असतात. रूग्णाचा ताबा पोलिसांकडे असतो, असेही डॉ. ठाकूर म्हणाले.
Join Our WhatsApp Community