Diwali Festival 2023 : आधीच वेळेवर पगार नाही, बोनस नाही, त्यातच परे आणि मरेचा मेगाब्लॉक; दिवाळीच्या खरेदीवर सावट

पुढील आठवड्यात दीपावलीचा सण असून या सणाच्या शेवटच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारी रेल्वे लोकलचा फटका जनतेला बसलेला आहे.

167
Diwali Festival 2023 : आधीच वेळेवर पगार नाही, बोनस नाही, त्यातच परे आणि मरेचा मेगाब्लॉक; दिवाळीच्या खरेदीवर सावट
Diwali Festival 2023 : आधीच वेळेवर पगार नाही, बोनस नाही, त्यातच परे आणि मरेचा मेगाब्लॉक; दिवाळीच्या खरेदीवर सावट

येत्या शुक्रवारपासून दीपावलीच्या सणाला सुरुवात होत असून या सणाच्या पूर्वीचा शेवटचा शनिवार आणि रविवार हा सुट्टीचा दिवस आहे. परंतु एका बाजुला लोकांचे पगार झाले नाहीत किंवा काही लोकांचे बोनसही झाले नाही. त्यामुळे बचत केलेले पैसे किंवा कुणाकडे उसणे पैसे घेऊन दिवाळीची खरेदी करायची म्हटली तरी पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे कमी झालेल्या गाड्यांचे प्रमाण यामुळे कुटुंबांसह खरेदीला बाहेर पडणेही लोकांना कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे या खरेदीलाच आता ब्लॉक लागला असून लोकांना आता स्थानिक पातळीवरच आपली खरेदी उरकून घ्यावी लागणार आहे. (Diwali Festival 2023)

पुढील आठवड्यात दीपावलीचा सण असून या सणाच्या शेवटच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवारी रेल्वे लोकलचा फटका जनतेला बसलेला आहे. त्यामुळे दादरसह फोर्ट, लिकिंग रोड, मालाड, बोरीवली, घाटकोपर, ठाणे आदी भागांमध्ये दिवाळीच्या शॉपिंगचे प्लॅनिंग करणाऱ्यांना आपले हे प्लॅनिंग बदलण्याची वेळ आली आहे. शनिवारी पश्चिम रेल्वेवरील अनेक लोकल गाड्या रद्द केल्याने गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेता अनेकांनी आपले नियोजन रद्द केले, तर रविवारी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्याने या दिवशीचा खरेदीचा बेतच रद्द करण्याचा वेळ अनेकांवर आली असून त्यांनी स्थानिक पातळीवरच खरेदी आटोपून घेण्याचा निर्धार केल्याचे दिसून आले आहे. (Diwali Festival 2023)

(हेही वाचा – Tiger Baby Birthday: राणीच्या बागेत ‘जय’ आणि ‘रुद्र’चा वाढदिवस साजरा)

एका बाजुला रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे खरेदीचा बेत रद्द करण्याची वेळ आली असली तरी अनेकांचे पगार सात ते दहा तारखेच्या दरम्यान होत असल्याने त्यांच्या खरेदीचा अद्याप पत्ता नाही. तर पगाराबरोबरच अनेकांचे बोनसही न झाल्याने स्वत:सह मुलांबाळांचे तसेच इतर खरेदीचाही बेतही आखता आलेला नाही. त्यामुळे काहींनी आर्थिक संकटामुळे खरेदीचा विचारच केलेला नाही. त्यातच दिवाळीच्या सणासाठी कुणाकडून व्याजी पैसे घेऊन खरेदी करायचे प्लॅन केले तर गाड्यांचा गोंधळ सुरु आहे. (Diwali Festival 2023)

त्यामुळे दादरसह अनेक ठिकाणी खरेदीसाठी झुंबड उडालेली पहायला मिळत नाही. दादरमधील कपड्यांचे व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, यंदा दिवाळीच्या खरेदीची तेवढी गर्दी नसून शनिवारचा दिवस असून विक्री करणाऱ्यांची अधिक गर्दी आहे, पण त्यासाठी खरेदी करणाऱ्यांची तेवढी गर्दी दिसत नाही. नेहमीप्रमाणेच शनिवारच्या दिवशी गर्दी दिसत आहे. दिवाळीच्या सणानिमित्त होणारी गर्दी कुठेच दिसत नसून दिवाळीच्या सणासाठी वस्तूंची खरेदी केलेला तरी माल विकला जाईल काय बाबतच आम्हाला साशंका आहे. किमान मुद्दल तरी मिळावी हीच आता अपेक्षा आहे, असे त्या विक्रेत्याचे म्हणणे आहे. (Diwali Festival 2023)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.