-
ऋजुता लुकतुके
भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ रविवारी ईडन गार्डन्सवर आमने सामने येतील तेव्हा ही खऱ्या अर्थाने वर्चस्वाची लढाई असेल. गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावणं हा एक भाग झाला पण, अगदीच तगड्या दोन संघांना बाद फेरी आधी एकमेकांचं पाणी जोखायचं असणार. (Ind vs SA Preview)
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणारा भारत वि दक्षिण आफ्रिकेचा सामना आणि विराट कोहलीचा ३५ वा वाढदिवस एकाच दिवशी येत आहेत. त्यातच विराट कोहलीला खुणावतंय ४९ वं एकदिवसीय शतक. या शतकामुळे सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या विक्रमाशी तो बरोबरी करणार आहे. ही कामगिरी त्याने वाढदिवसाच्या दिवशी केली तर काय बहार येईल इसं त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना वाटत असणार. (Ind vs SA Preview)
पण, विराटच्या मनात मात्र २०११ च्या विश्वचषकातील सामन्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. विराट आणि अश्विन हे दोघेच भारतीय २०११ च्या विश्वचषक संघातही होते आणि तेव्हाचा आफ्रिकन संघाबरोबरचा सामना खास होता. नागपूरमध्ये झालेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकरने शतक झळकवलं. सेहवागनेही सलामीला ७३ धावा केल्या आणि त्यानंतर पुढील फलंदाज एकामागून एक पॅव्हेलियनमध्ये परतले. शेवटी भारताने धावफलकावर २९६ धावा जमवल्या. (Ind vs SA Preview)
ही काही छोटी धावसंख्या नव्हती. उत्तरादाखल आफ्रिकेचे गडीही ठरावीक अंतराने बाद होत होते. पण, आशीष नेहराने त्याची कारकीर्द संपवणारं ते षटक टाकलं. ज्यात रॉबिन पीटरसनने १९ धावा कुटल्या. त्या षटकामुळे आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनी २९७ धावा पूर्ण केल्या त्या ३ गडी राखून. (Ind vs SA Preview)
नंतर भारताने विश्वचषक जिंकला. पण, स्पर्धेत त्यांचा एकमेव पराभव झाला तो दक्षिण आफ्रिकेकडून. विराट स्वत: १ धाव करून बाद झाला होता. हा सामना अनपेक्षित कलाटणीमुळे विराटला नक्कीच लक्षात असेल. आणि या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित असलेल्या संघाला असा अचानक ब्रेक लागावा असा पराभव नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या विजयाने साचलेपण न येता आणि नेहमीचंच काम सातत्याने करता आलं तर भारतीय संघाला आफ्रिकन मुकाबलाही अवघड जाणार नाही. (Ind vs SA Preview)
(हेही वाचा – Devendra Fadnavis: एल्विश यादवच्या अटकेवरून देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल)
तर दुसरीकडे आफ्रिकन संघ नेदरलँड्सने दिलेल्या धक्क्यानंतर चवताळून उठलाय. सातत्याने ३५० च्या वर धावा करतोय. क्विंटन डी कॉक, व्हॅन देअर मर्व्ह, क्लासेन लिलया षटकार ठोकतायत. ते फक्त धावाच करत नाहीएत तर खेळाचा नूर पालटणारी खेळी रचतायत. त्यामुळे कागदावर पाहिलं तर या लढतीचं स्वरुप दक्षिण आफ्रिकन फलंदाजी वि. भारतीय गोलंदाजी असंच असणार आहे. (Ind vs SA Preview)
भारतीय संघाच्या बाबतीत असं पहिल्यांदा होत असेल की, त्यांच्या फलंदाजांपेक्षा गोलंदाजांची चर्चा होतेय. हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाद झाला असला तरी जसप्रीत बुमरा, महम्मद शामी आणि महम्मद सिराज यांनी त्याची उणीव जाणवू दिलेली नाही. या घडीला या तिघांमुळे आणि त्यांना कुलदीप आणि जाडेजाकडून मिळणाऱ्या फिरकीच्या साथीमुळे भारतीय गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वोत्तम आहे. (Ind vs SA Preview)
नाही म्हणायला दक्षिण आफ्रिकन संघाने अजून धावसंख्येचा पाठलाग करताना मोठा विजय मिळवलेला नाही. उलट डच संघाकडून त्यांचा पराभवच झाला. ही एकमेव त्रुटी सध्या त्यांच्या संघात दिसतेय. तर भारताची मधली फळी सातत्यपूर्ण धावा करत नाहीए. या काही छोट्या गोष्टी सोडल्या तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि म्हणूनच ईडन गार्डन्सवरील सामना खास असणारए. (Ind vs SA Preview)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community