ठाणे मनोरुग्णालयात जेवणाचे कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
राजू एरम अंदाजे, दत्तात्रय कुलकर्णी, यशोदीप कुलकर्णी, भुवनेश कुलकर्णी आणि जनार्दन चांदणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश बाळासाहेब तुपेरे (४३, रा. संभाजीनगर, धनकवडी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
(हेही वाचा – Congress : काँग्रेसने सट्टेबाजीचा पैसा छत्तीसगडच्या निवडणुकीत वापरला; प्रवीण दरेकरांचा आरोप )
तुपेरे आणि त्याच्या मित्राची आरोपींशी ओळख झाली त्यानंतर आरोपींनी त्यांना येरवडा येथील मनोरुग्णालय परिसरात भेटायल बोलावून ठाणे मनोरुग्णालयात जेवणाचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगून यासंदर्भातील बनावट कागदपत्रे दाखवून १० लाख रुपये उकळले. पैसे घेतल्यानंतर जेवणाचे कंत्राट मिळवून दिले नाही. याबाबत त्यांनी आरोपींकडे विचारणा केली असता, आरोपींनी तुपेरे यांना उडवाउडवीची उत्तरे दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुपेरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवदास लहाने करत आहेत.
हेही पहा –