Toll Plazas In Mumbai : मुंबईतील टोल प्लाझाच्या ठिकाणी स्वच्छता राखा; महापालिकेचे एमएसआरडीसीला निर्देश

मुंबईतील हवेतील प्रदुषण नियंत्रित आणण्याबाबत उपाययोजना आखल्या जात असतानाच मुंबईच्या प्रत्येक टोल नाक्यांवर वाहतूक कोंडीदरम्यान होणाऱ्या प्रदुषणाबाबतही उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अर्थात एमएसआरडीसीला दिले आहेत.

153
Toll Plazas In Mumbai : मुंबईतील टोल प्लाझाच्या ठिकाणी स्वच्छता राखा; महापालिकेचे एमएसआरडीसीला निर्देश
Toll Plazas In Mumbai : मुंबईतील टोल प्लाझाच्या ठिकाणी स्वच्छता राखा; महापालिकेचे एमएसआरडीसीला निर्देश

मुंबईतील हवेतील प्रदुषण नियंत्रित आणण्याबाबत उपाययोजना आखल्या जात असतानाच मुंबईच्या प्रत्येक टोल नाक्यांवर वाहतूक कोंडीदरम्यान होणाऱ्या प्रदुषणाबाबतही उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अर्थात एमएसआरडीसीला दिले आहेत. (Toll Plazas In Mumbai)

मुंबईतील दहिसर, मुलुंड, वाशी, ऐरोली यासह पाच याठिकाणी टोल नाके असून मुंबइच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या या रस्त्यावर एमएसआरडीसीच्या (MSRDC) नियुक्त संस्थेकडून वसूल केला जात आहे. या टोल वसुलीसाठी काही मिनिटांकरता थांबवली जात असून या वाहतूक कोंडीदरम्यान हवेतील प्रदुषणाचा त्रास वाहन चालकांना आणि प्रवाशांना होत असतात. या टोल प्लाझाच्या ठिकाणी वाहनांसह कचऱ्यामुळे प्रदुषणात वाढ होत असल्याने याठिकाणी प्रदुषित हवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याने महापालिका प्रशासनाने टोल प्लाझा स्‍वच्‍छतेसाठी महाराष्ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळ (MSRDC) यांना सूचित करण्यात यावे, असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. (Toll Plazas In Mumbai)

एमएसआरडीसीने (MSRDC) नियुक्त केलेल्या संस्थेकडूनच टोल प्लाझाची देखभाल केली जात असून याठिकाणी स्वच्छता राखतानाच धुळीचा त्रास टोल भरण्यासाठी उभ्या राहणाऱ्या वाहनचालकासह प्रवाशांना होणार नाही याची काळजी आता नियुक्त संस्थेकडून घेण्याचे निर्देश एमएसआरडीसी (MSRDC) कशाप्रकारे देत याची अंमलबजावणी करायला लावते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Toll Plazas In Mumbai)

(हेही वाचा – Air Pollution Control : वायू प्रदुषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन; मुंबईतील ४६१ बांधकाम प्रकल्पांना महापालिकेची नोटीस)

राडारोडा वाहणाऱ्या ट्रकवर जीपीएस यंत्रणा

महानगरपालिकेने वायू प्रदूषणासाठी निर्गमित केलेल्या सुचनांप्रमाणे, बांधकाम साहित्य तसेच राडारोडा (डेब्रीज) ने-आण करणारी वाहने झाकलेली असावीत. राडारोडा वाहतूक करताना, प्रत्येक खेपेस त्यावर तुषार फवारणी करावी. प्रत्‍येक खेपेनंतर वाहनांची पूर्ण स्वच्छता करावी. राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या प्रत्‍येक वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित असावी, जेणेकरुन त्यांच्या हालचालींवर अद्ययावत निरीक्षण करता येईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेसोबत या ट्रकवर बसवण्यात येणारी व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टम (VTMS) यंत्रणा लिंक करावी, असेही निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. (Toll Plazas In Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.