Vandana Shiva : गांधी ऑफ ग्रेन म्हणून ओळखल्या जाणार्‍या वंदना शिवा यांचा परिचय

229
वंदना शिवा (Vandana Shiva) यांचा जन्म डेहराडूनच्या खोऱ्यात ५ नोव्हेंबर १९५२ रोजी झाला. त्यांचे वडील वनसंरक्षक आणि आई निसर्ग प्रेम होती. त्यांचे शिक्षण नैनिताल येथील सेंट मेरी कॉनव्हेंट स्कूल आणि कॉनव्हेंट ऑफ जीझस अँड मेरीमध्ये झाले. वंदना शिवा एक प्रशिक्षित जिम्नॅस्ट होत्या. त्यांनी कॅनडात पदवीचे शिक्षण घेतले. गुल्फमधून एमए आणि पश्चिमी ओन्टेरियो विश्वविद्यालयातून पीएचडी पूर्ण केली.  त्यांनी १९७८ मध्ये डॉक्टरी शोध निबंध “हिडेन वॅरिएबल्स ऍंड लोकेलिटी इन क्वान्टम थ्योरी” या विषयावर डॉक्टरेट प्रबंधासह पीएचडी पूर्ण केली.
वंदना यांनी १९८७ मध्ये देशी बियाणे वाचवण्यासाठी आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवधान्य नावाची संस्था स्थापन केली होती. नवधान्य स्थानिक शेतकऱ्यांना सहकार्य प्रदान करते. तसेच नामशेष होणारी पिके आणि वनस्पतींच्या प्रचारासाठी समर्पित होऊन काम करते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवधान्य ही एक राष्ट्रीय चळवळ बनली आहे. म्हणून वंदना शिवा हरीत योद्धा आहेत.
पर्यावरण वाचवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. टाइम मासिकाने २००३ मध्ये वंदना शिवा यांना ‘एनवायरमेंटल हिरो’ ही पदवी बहाल केली होती आणि २०१० मध्ये फोर्ब्सने त्यांना जगातील सात सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये स्थान दिले होते.
१९८२ मध्ये त्यांनी रिसर्च फाउंडेशन फॉर सायन्स टेक्नॉलॉजी आणि इकोलॉजीची स्थापना केली. त्यांचा भर सेंद्रिय शेतीवर अधिक आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे काम त्या अविरत करत असतात. वंदना शिवा १९७० मध्ये चिपको आंदोलनाशी संबंधित होत्या. त्यानंतर पर्यावरण रक्षणासाठी प्रचंड परिश्रम घेतले आहे. रसायनांच्या वापरामुळे पिकांचे नुकसान होते म्हणून त्या सेंद्रिय शेतीसाठी आग्रही आहेत.
त्याचबरोबर कापूस लागवड आणि जीएम पिकांमधील बदलांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे वंदना (Vandana Shiva) भारतात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. कापूस पिकातील बदलांमुळे २७०,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्याचे वर्णन त्यांनी नरसंहार म्हणून केले. वंदना शिवा या तत्त्वज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्त्या, पर्यावरण तसेच स्त्रीवादी संबंधित अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अग्रगण्य वैज्ञानिक आणि तांत्रिक जर्नल्समध्ये ३०० हून अधिक लेख लिहिले आहेत. जीएमओ विरोधी चळवळीमुळे त्यांना ’गांधी ऑफ ग्रेन’ म्हटले जाते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.