World Cup 2023 : दिल्लीतील प्रदूषणामुळे बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकन संघानेही केला सराव रद्द

नवी दिल्लीत मागचे दोन दिवस हवेची गुणवत्ता खूपच ढासळली आहे. त्यामुळे बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकेलाही आपलं सराव सत्र रद्द करणं भाग पडलं आहे. शेवटी आयसीसीलाही या गोष्टीची दखल घ्यावी लागली.

201
World Cup 2023 : दिल्लीतील प्रदूषणामुळे बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकन संघानेही केला सराव रद्द
World Cup 2023 : दिल्लीतील प्रदूषणामुळे बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकन संघानेही केला सराव रद्द
  • ऋजुता लुकतुके

नवी दिल्लीत मागचे दोन दिवस हवेची गुणवत्ता खूपच ढासळली आहे. त्यामुळे बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकेलाही आपलं सराव सत्र रद्द करणं भाग पडलं आहे. शेवटी आयसीसीलाही या गोष्टीची दखल घ्यावी लागली. (World Cup 2023)

नवी दिल्लीत मागचे दोन दिवस हवेची गुणवत्ता ‘गंभीररीत्या प्रदूषित’ स्तरापर्यंत घसरली आहे. त्यामुळे बांगलादेशनेही आपलं शनिवारचं सराव सत्र रद्द केलं होतं. पाठोपाठ आता श्रीलंकन संघालाही रविवारी तोच निर्णय घेणं भाग पडलं आहे. अखेर आयसीसीलाही या गोष्टीची दखल घेणं भाग पडलं आहे. (World Cup 2023)

श्रीलंका आणि बांगलादेश दरम्यान सोमवारी नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सामना रंगणार आहे. त्यासाठी लंकन संघ शुक्रवारी दिल्लीत दाखल झाला आणि शनिवारी त्यांचं पहिलं सराव सत्र होतं. हवेची गुणवत्ता आणि वाढतं प्रदूषण यामुळे खेळाडूंनी सराव केला नाही. रविवारी सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०७ पर्यंत घसरला होता. (World Cup 2023)

हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ० ते ५० च्या मध्ये असेल तर तो चांगला असतो. ५१ ते १०० दरम्यान योग्य, १०१ ते २०० दरम्यान ठिक, २०१ ते ३०० दरम्यान खराब, ३०१ ते ४०० दरम्यान खूप खराब आणि ४०१ ते ५०० दरम्यान अतीखराब असा गुणवत्तेचा स्तर आहे. (World Cup 2023)

हवेतील प्रदूषणामुळे मैदानात दृश्यताही कमी होते. त्यामुळे दोन्ही संघांनी बाहेर न पडता हॉटेलमध्ये बसून राहण्याचा निर्णय घेतला. आयसीसी ऐनवेळी स्पर्धेचं ठिकाण बदललं अशक्य आहे. पण, सामना भरवायचा की नाही याचा निर्णय सामन्याच्या दिवशी धेतला जाऊ शकतो. नवी दिल्लीत शुक्रवार आणि शनिवारी खराब हवेचा इशारा देण्यात आला होता आणि मुलांच्या शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. (World Cup 2023)

(हेही वाचा – Sudhir Mungantiwar : युवकांना नशा केवळ देशभक्तीची हवी)

‘आम्ही दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा वारंवार आढावा घेत आहोत आणि याविषयी तज्ञांचा सल्लाही घेत आहोत. आयसीसी आणि आयोजक बीसीसीआय यांना सहभागी खेळाडूंच्या हिताची काळजी आहे. त्यामुळे परिस्थितीचा नीट अंदाज घेतला जाईल,’ असं आयसीसीमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं होतं. (World Cup 2023)

अर्थात, हवेतील दृश्यता आणि प्रदूषण यांचा आढावा प्रत्येकच सामन्यापूर्वी सामना अधिकाऱ्यांकडून घेतला जातो. यंदा विश्वचषकात शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पण, अजून एकही सामना रद्द करावा लागलेला नाही. आता नवी दिल्लीतील सामना होतो की नाही, हे सोमवारी ठरेल. (World Cup 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.