छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील नारायणपूर येथे शनिवार ४ नोव्हेंबर रोजी नक्षलवाद्यांनी भाजप नेत्याची हत्या केली. (Ratan Dubey) रतन दुबे असे भाजप नेत्याचे नाव असून ते नारायणपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी होते.
यासंदर्भातील पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार भाजपा नेते (Ratan Dubey) रतन दुबे हे शनिवारी नारायणपूरच्या कौशल नार गावात भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेत होते. यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. काही नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करत त्यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
#WATCH | The mortal remains of BJP leader Ratan Dubey who was murdered today in the insurgency-hit Narayanpur district of Chhattisgarh was brought to the District Hospital in Chhattisgarh’s Narayanpur. https://t.co/ibZF2HBsIX pic.twitter.com/DBiVQmMggP
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) November 4, 2023
यासंदर्भात (Ratan Dubey) प्रतिक्रिया देताना भाजप नेते ओमप्रकाश माथूर म्हणाले की, “नक्षलवादी हताश झाले आहेत. त्यांना भीती वाटत आहे की, जर छत्तीसगडमध्ये भाजपाची सत्ता आली तर आपण जिवंत राहणार नाही. त्यामुळे ते ‘टार्गेट किलिंग’ करत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. त्यामुळे माझे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, या सर्व बाबींचा सामना करत आपण निवडणुकीत ठामपणे उभे राहू आणि निवडून येऊ आणि येत्या काळात नक्षलवाद्यांची समस्या समूळ नष्ट करू.” (Ratan Dubey)
#WATCH | BJP Chhattisgarh in charge, Om Prakash Mathur says, “While Ratan Dubey he was chairing a meeting with the party workers in an interior village, was attacked by the Naxals…I appeal to the party workers & leaders that we will take revenge for this by winning the… https://t.co/ibZF2HBsIX pic.twitter.com/N0aFGCuDvT
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) November 4, 2023
(हेही वाचा – Vidya Vihar Second Girder : विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर देखील यशस्वीपणे स्थापित)
सध्या देशात छत्तीसगडसह (Ratan Dubey) एकूण पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community