PM Narendra Modi : दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश आज सगळ्या जगाला मदत मागत आहे’; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला नाव न घेता टोला

187
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले हे लोकांना सांगा; PM Narendra Modi यांचे भाजपा खासदारांना निर्देश

जे देश भारतावर दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा देत होते त्यांना आता जगाला वाचवण्याचे आवाहन करणे भाग पडले आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका माध्यम समूहाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर नाव न घेता टोला लगावला आहे. (PM Narendra Modi )

यावेळी पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्यापासून २०१४ पर्यंत भारत मानसिक अडथळ्यांचा बळी होता. ते म्हणाले की, या अडथळ्यांमुळे भारताला स्वातंत्र्यानंतर हवी ती प्रगती साध्य करता आली नाही.भारत प्रत्येक अडथळे तोडत आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागाच्या त्या भागावर उतरला आहे जिथे कोणीही पोहोचले नाही.मोबाईल निर्मितीमध्ये भारत आघाडीवर आहे. स्टार्ट-अपमध्ये भारत पहिल्या तीनमध्ये आहे अशीही माहिती त्यांनी दिली. नुसत्या घोषणांनी गरिबीवर मात करता येत नाही, तर उपायांनी लढता येते’, असेही ते म्हणालेत.

(हेही वाचा : Israel Hamas War : दक्षिण गाझामध्ये इस्त्रायली सैन्याची घुसखोरी)

मोदी पुढे म्हणाले की, “अनेकांना त्यांच्या सरकारच्या जन धन खाते योजनेवर शंका होती. बँका केवळ श्रीमंतांसाठीच आहेत असे मानणाऱ्या गरीब लोकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्यात ही योजना यशस्वी ठरली.एसी रूममध्ये राहणाऱ्या लोकांना गरीब लोकांचे मानसिक सशक्तीकरण कधीच समजणार नाही,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवाद संपत आहे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन वाढत आहे,” असंही त्यांनी पुढे नमुद केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.