High Court : गुजरात उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले; तुम्ही स्वतःला देव किंवा राजे समजता का?

116
गुजरातमध्ये एक जोडपे रात्री उशिरा प्रवास करत होते, म्हणून पोलिसांनी त्यांना त्रास दिला, या प्रकरणाची गुजरात उच्च न्यायालया (High Court) ने गंभीरतेने स्वतःहून दखल घेतली आणि पोलिसांना चांगलेच खडसावले, पोलीस स्वतःला देव किंवा राजे समजतात का, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावले.

नेमके काय घडले?

गुजरात उच्च न्यायालया (High Court)ने स्वत:हून एका प्रकरणाची दखल घेऊन त्यासंदर्भात जनहित याचिका दाखल करून घेतली होती. एका जोडप्याला रात्री उशिरा प्रवास केला म्हणून काही पोलिसांकडून त्रास देण्यात आला. तसेच, त्यांच्याकडून ६० हजार रुपयेही संबंधित पोलिसांनी घेतल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांविरोधातील तक्रार दाखल करण्यासाठी काय यंत्रणा आहे? अशी विचारणा न्यायमूर्तींनी पोलीस प्रशासनाला केली.

काय म्हणाले न्यायालय? 

तुमच्या कार्यालयाच्या बाहेर कुणीही उभे राहू शकत नाही. सामान्य नागरिकांनी तुमच्या कार्यालयाच्या बाहेर उभे राहावे अशी तुमची इच्छा आहे का? त्यांना कोण याची परवानगी देणार आहे? तुमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त असे वागतात जणूकाही ते प्रत्येक्ष देव किंवा राजे आहेत, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती सुनीता अगरवाल यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले. त्रास देणाऱ्या पोलिसांविरुद्ध तक्रार करण्यासाठी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर तर दिला आहे, पण त्याची कुणाला माहितीच नसेल, तर त्याचा उपयोग काय? हे भार भयानक वास्तव आहे. सगळ्यांना ते माहिती आहे. एका सामान्य नागरिकाला पोलीस स्थानकात किंवा आयुक्तांच्या कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करणे फारच कठीण असते. आम्ही दोघे न्यायमूर्ती कधीकाळी एक सामान्य नागरिकच होतो. त्यामुळे आम्हाला याबद्दलच्या वास्तवाची पूर्ण कल्पना आहे. आमचे स्वत:चे काही अनुभव आहेतमी असेही न्यायमूर्ती अगरवाल यांनी यावेळी नमूद केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.