Chandrakant Patil : पुण्यात दोन्ही दादा एकत्र – चंद्रकांत पाटील

113
राज्याच्या प्रगतीसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कार्यरत आहेत. त्यातच अजित पवार यांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे लोककल्याणासाठी पुण्यात दोन्ही दादा एकत्र आहेत. त्यामुळे जनहिताचे प्रकल्पांना गती मिळत आहे, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.
कोथरुड मतदारसंघातील बाणेर पश्चिम, सूस- म्हाळुंगे आणि पाषाण येथील सोसायटी भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून महानगर गॅस व्यवस्था उपलब्ध व्हावी; अशी मागणी होती. त्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र नॅचरल गॅसला डीआरएस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेची जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे बाणेरमधील पाच हजार नागरिकांना महानगर गॅसची व्यवस्था उपलब्ध झाली. याचे लोकार्पण युतिका सोसायटीत आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. डिसेंबर मध्ये विमानतळ परिसरातील मेट्रो प्रकल्प कार्यान्वित होईल.तसेच २४×७ च्या माध्यमातून ८२ पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. याशिवाय सांडपाणी शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प उभारले जात आहेत. पाटील (Chandrakant Patil) पुढे म्हणाले की ,‌कोथरुड मध्ये १०० आदर्श सोसायटी निर्माण करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटी मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा निर्गत प्रकल्प यांसारखे उपक्रम सुरू करावेत.‌यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच, कोथरुड मधील पाचशे सोसायटींमध्ये लोकसहभागातून सॅनिटरी पॅड व्हेडिंग आणि व्हॅनिशिंग मशीन कार्यान्वित करण्यात येत असून, त्याचाही सोसायटीने लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.