इस्रायल-हमास युद्धाचा २९ वा दिवस आहे. दरम्यान, यूएनचे (UN) म्हणणे आहे की गाझामध्ये कोणतीही जागा सुरक्षित राहिलेली नाही. त्याचवेळी, अल जझीरानुसार, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की इस्त्रायलच्या सततच्या हल्ल्यामुळे येथे २२०० लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. त्यापैकी १२५० मुले आहेत. लष्कर मशिदींवरही हल्ले करत आहे. त्याचवेळी, अल-अक्सा रेडिओनुसार, इस्रायलने हमास प्रमुख इस्माइल हनीये यांच्या घरावर हल्ला केला आहे. त्यांचे कुटुंबीय या घरात राहत होते मात्र हल्ल्याच्या वेळी ते तेथे होते की नाही याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. (Israel- Palestine Conflict)
येथे लष्कराने म्हटले आहे की गाझा आता दोन भागात विभागला गेला आहे. आम्ही दक्षिण गाझाला मानवतावादी मदत पोहोचवत आहोत. हमासचा कोणीही सैनिक तेथे पोहोचला तर त्याला ठार मारले जात आहे. उत्तर गाझामध्ये युद्ध तीव्र झाले आहे. तेथे पॅलेस्टिनी लोकांच्या जीवाला धोका आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार , ३१ ऑक्टोबर रोजी इस्रायलने गाझाच्या सर्वात मोठ्या निर्वासित छावणीच्या जबलियावर ९०७ किलो वजनाचा बॉम्ब टाकला होता. NYT ने घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडिओंचे विश्लेषण केले. त्यात ४० फूट रुंद दोन खड्डे दिसले. या हल्ल्यात सुमारे १९५ लोक मारले गेले. त्याचबरोबर जबलिया कॅम्प, यूएन शाळा आणि रुग्णालयांवर झालेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकन सरकारने इस्रायलकडून उत्तरे मागितली आहेत.
(हेही वाचा : Chandrakant Patil : पुण्यात दोन्ही दादा एकत्र – चंद्रकांत पाटील)
दुसरीकडे, व्हाईट हाऊसने दावा केला आहे की, हमास गाझा सोडणाऱ्या परदेशी नागरिकांच्या यादीत आपल्या सैनिकांची नावेही जोडत आहे. याद्वारे तो त्यांना इजिप्तमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी इस्रायलने मुलांच्या रुग्णालय अल नसरवर बॉम्बफेक केल्याचा दावा अल जझिराने केला आहे. यामध्ये अनेकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी इस्रायलमध्ये अडकलेल्या हजारो गाझा कामगारांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. वास्तविक, सुमारे १७ हजार पॅलेस्टिनींना इस्रायलमध्ये काम करण्याची परवानगी आहे. त्यापैकी ३३०० पॅलेस्टिनी युद्धात अडकले होते. गोळीबाराच्या दरम्यान शुक्रवारी रात्री त्यांना दक्षिण गाझा येथे नेण्यात आले. (Israel- Palestine Conflict)
हेही पहा –