Beed Violence : जाळपोळीची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे करणार

156

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीड (Beed Violence) मध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनेनंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. बीडमध्ये जिथे हल्ले झाले त्या भागाची पाहाणी करुन धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं म्हटलं आहे.

बीडमध्ये झालेल्या हल्ल्यांचा विचार केल्यास काही ठाराविक लोकांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून झालं आहे, त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

(हेही वाचा High Court : गुजरात उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले; तुम्ही स्वतःला देव किंवा राजे समजता का?)

रविवारी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, राज्याच्या इतिहासात कधीच अशा पद्धतीच्या घटना घडल्या नाहीत. मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भातील निमित्त होतं. प्रकाश सोळंके यांच्या ऑडिओ क्लिपमधील अर्थाचा अनर्थ करुन बीड जिल्हा पेटवण्याचा (Beed Violence)  प्रयत्न करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.