Happy Birthday Virat Kohli : शतकी खेळीने विराटने केली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी

201
Virat Kohli : विराट कोहलीच्या २७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण
Virat Kohli : विराट कोहलीच्या २७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण

विराट कोहली ( Virat Kohli) साठी रविवार, ५ नोव्हेंबरचा दिवस खास होता. कारण कोहलीचा ३५वा वाढदिवस आहे.  त्यामध्येच भारताचा सामना हा दक्षिण आफ्रिकेशी इडन गार्डन्समध्ये होणार होता. त्यामुळे कोहली या सामन्यात काय करणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती. या सामन्यात खेळत असताना कोहलीने अखेर त्याने क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर याच्या वन डेतील ४९व्या शतकाच्या रेकॉर्डची बरोबरी केली. त्यावेळी मैदानात प्रेक्षकांनी मोबाईलच्या लाईट लावल्या.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने वादळी सुरुवात करुन दिली. पण एकापाठोपाठ एक दोन धक्के बसल्यानंतर विराट कोहली  ( Virat Kohli)ने भारताचा डाव सावरला.  विराट कोहलीने मैदानावर वर्चस्व गाजवले. विराट कोहलीने  श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने 119 चेंडूमध्ये शतक ठोकले. सुरुवातीच्या षटकात विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. चांगल्या चेंडूला मान देत विराट कोहलीने एकेरी दुहेरी धावसंख्या काढली. त्यानंतर वेगाने धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या शतकी खेळीत 10 चौकारांचा समावेश आहे.

(हेही वाचा High Court : गुजरात उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले; तुम्ही स्वतःला देव किंवा राजे समजता का?)

सचिन तेंडुलकरची वनडेमधील कामगिरी 

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. सचिन तेंडुलकरने 452 वनडे डावात 44.8 च्या सरासरीने तब्बल 18 हजार 426 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने 49 शतके ठोकली आहेत. त्याशिवाय 96 अर्धशतकेही लगावली आहेत. यादरम्यान त्याने 195 षटकार आणि 2016 चौकारांचा पाऊस पाडला आहे. सचिन तेंडुलकर वनडेमध्ये 41 वेळा नाबाद राहिला आहे. सचिन तेंडुलकरची वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 200 धावा इतकी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.