Uttarakhand : ३० मदरशांमध्ये ७४९ गैर मुस्लिम विद्यार्थी शिकताहेत Islam

152

उत्तराखंड (Uttarakhand) मधील विविध भागात असलेल्या ३० मदरशांमध्ये गैर-मुस्लिम मुले   Islam चे शिक्षण घेत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत ७४९ गैर-मुस्लिम विद्यार्थ्यांची ओळख पटली असून, त्यात हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे. हे मदरसे उधम सिंह नगर, नैनिताल आणि हरिद्वार जिल्ह्यात आहेत. या संदर्भात राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने (NCPCR) उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेकडून उत्तर मागितले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, NCPCR ने 2 नोव्हेंबर 2023 रोजी उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेला पत्र जारी केले होते. या पत्रात राज्यभरातील मदरशांमध्ये एकूण किती विद्यार्थी शिकत आहेत, याची माहिती मागवण्यात आली होती. आयोगाने उत्तर देण्यासाठी 1 आठवड्याचा म्हणजेच 9 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. NCPCR च्या नोटीसवरून उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेने अहवाल तयार केला आहे.

उत्तराखंड (Uttarakhand) मधील मदरशांमध्ये एकूण ७३९९ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. यातील ७४९ विद्यार्थी गैरमुस्लिम आहेत. हे सर्व बिगर मुस्लिम विद्यार्थी ३० वेगवेगळ्या मदरशांमध्ये  Islam चे शिक्षण घेतात. हरिद्वारच्या मदरशांमध्ये सर्वाधिक बिगर मुस्लिम विद्यार्थी आहेत. शिकोहपूर, हरिद्वार येथील मदरसा राव असगर अली मेमोरियल पब्लिक स्कूलमध्ये १३१ गैर-मुस्लिम विद्यार्थी, टिळकपूरमधील मदरसा बहार-ए-चमनमध्ये ११२ आणि मदरसा तुल ​​अलीम, रुरकी येथे ७९ विद्यार्थी शिकतात.

(हेही वाचा : Beed Violence : जाळपोळीची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे करणार)

हरिद्वारमध्येच मदरसा राष्ट्रीय एकतामध्ये ८५ बिगर मुस्लिम विद्यार्थी आणि मदरसा जामिया इस्लामियामध्ये ५० बिगर मुस्लिम विद्यार्थी शिकत आहेत. याशिवाय मदरसा साबीर इस्लामियामध्ये ६८ बिगर मुस्लिम विद्यार्थी आणि उधमसिंह नगर येथील साबीर बाबा साहेब मदरसामध्ये २१ बिगर मुस्लिम विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नैनितालच्या मदरसा सिराजुल उलूम नूरियामध्ये चार गैर-मुस्लिम मुले शिकत आहेत. मुस्लिम विद्यार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीतही हरिद्वार पहिल्या क्रमांकावर आहे.

एकट्या हरिद्वारमध्ये २१ मदरसे आहेत. त्याच वेळी, उधम सिंह नगरमध्ये ९ आणि नैनितालच्या गुलारघाटी रामनगरमध्ये १ मदरशांची नोंद झाली आहे. हा अहवाल उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेचे संचालक राजेंद्र सिंह यांनी पाठवला आहे. या अहवालात राज्य मदरसा शिक्षण परिषदेने म्हटले आहे की, सर्व मुलांना एनसीईआरटीच्या धर्तीवर शिकवले जात आहे. तसेच, हा अभ्यास मुलांच्या पालकांच्या संमतीने केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.