अरदेशर खबरदार हे पारशी असून Gujratiमध्ये काव्य रचना करायचे. त्यांना जन्म एका पारशी कुटुंबात ६ नोव्हेंबर १८८१ रोजी दमन येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण दमन आणि न्यू भरदा हायस्कूल मुंबई येथे झाले. १९०९ मध्ये त्यांनी मोटर सायकलच्या ऍक्सेसरीजचा व्यवसाय सुरु केला. त्यांचे शिक्षण फारसे झाले नाही. त्यांचे पुढील वास्तव्य मद्रास येथे असले तरी त्यांच्या मनात गुजराती समाजाविषयी आदराची भावना होती. त्यांनी मद्रासमध्ये राहून गुजराती भाषेत कविता केल्या.
त्यांनी विविध प्रकारच्या कविता लिहिल्या असून एकून ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी त्यांच्य अपारशी धर्मावर सुनीत लिहिले आहेत. सुनीत हा काव्याचा एक प्रकार असून यास सॉंनेट देखील म्हटले जाते. त्यांनी त्यांचे लिखाण ’अदल’ या टोपण नावाने केले आहे. त्याचबरोबर मोतीलाल, खोजो भगत, श्रीधर, शेशाद्री इ. अशी टोपण नावे देखील त्यांनी वापरली आहेत.
(हेही वाचा : Israel- Palestine Conflict : गाझाच्या मशिदींवर इस्रायलचे हल्ले; UNने म्हटले- तिथे एकही जागा सुरक्षित नाही)
ज्या ज्या वसे एक गुजराती (Gujrati), त्या त्या सदाकाल गुजरात या काव्यात त्यांनी गुजरातचा गौरव केला असून हे काव्य गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी पारशी गुजरातीत लिखाण करण्याऐवजी सर्वसामान्य कळेल अशा आधुनिक गुजराती भाषेत लिखाण केलं आहे. मुंबई विद्यापीठातील त्यांची ’ठक्कर व्याख्यानमाला’ खूप प्रसिद्ध झाली होती. गुजराती कवितानी रचनाकळा या नावाने ही व्याख्याने प्रकाशित झाली आहेत. साहित्यातले त्यांचे विशेष योगदान म्हणजे गुजरातीमध्ये विडंबन कविता प्रथम त्यांनीच रचली आहे.
गुजराती (Gujrati) साहित्याला त्यांनी छंद सुद्धा अर्पण केले आहेत. विविध छंदांच्या मिश्रणातून त्यांनी मुक्तधारा, अमीरो इत्यादी नवीन छंद गुजराती भाषेला अर्पण केले. त्यांच्या कविता ह्या राष्ट्रीय व वीररसाने भरलेल्या होत्या. अमारे देश, सदाकाल गुजरात इत्यादी राष्ट्रीय कविता पुष्कळ गाजल्या. त्यांनी मनुराज नावाने एक नाटक लिहायला घेतले होते. मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. आधुनिक गुजराती कवितांमध्ये त्यांनी दिलेलं योगदान विसरता येण्यासारखं नाही.
Join Our WhatsApp Community