Mahadev App वर केंद्राकडून बंदी

160

ज्या Mahadev App मधून बेटिंग केल्याने राजकीय आणि सिने क्षेत्रातील मोठमोठी मंडळी अडचणीत सापडली, अशा महादेव बुकिंग Appवर केंद्र सरकारकडून बंद आणण्यात आली आहे. या App सह आणखी २२ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

Mahadev Appच्या माध्यमातून बेकायदेशीर सट्टेबाजी होत असल्याचे ED ने नमूद केले होते. त्यानुसार केंद्र सरकारला अ‍ॅपवर बंदी घालण्याबाबत निवेदन केले होते. सरकारने निर्णय घेत अ‍ॅपवर बंदी घातली आहे. छत्तीसगडमध्ये दोन दिवसांपूर्वी काही कोटींची रक्कम या अ‍ॅपशी संबंधित ठिकाणांहून जप्त करण्यात आलेली होती. या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचाही संबंध असल्याचे ED ने नमूद केले आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील निवडणुकीसाठी महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून पैसे पाठविले जात असल्याची माहिती ‘ईडी’ला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी असीम दास याला अटक केली. दास याच्याकडून ५.३९ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हे पैसे छत्तीसगडमधील एका राजकीय नेत्याला निवडणुकीसाठी देण्यात येणार होते, असे त्याने चौकशी दरम्यान सांगितल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.

(हेही वाचा : Rahul Gandhi केदारनाथ धामला दर्शनासाठी आले आणि ‘मोदी-मोदी’ च्या घोषणांनी स्वागत झाले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.