Grampanchayat Results: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप त्रिशतकाच्या उंबरठ्यावर

अहमदनगर जिल्ह्यात निकाल येण्यास सुरुवात

293
Grampanchayat Results: ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी - २०२३ 
Grampanchayat Results: ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी - २०२३ 
१२:३० वाजेपर्यंत झालेले मतदान
भाजप शिंदे ठाकरे कॉंग्रेस शरद पवार अजित पवार इतर Total
२८४ १४४ ६५ ८२ ६८ २०१ १२२ ९६६

 

महत्त्वपूर्ण घडामोडी:

  • भाजप आणि अजित पवार गटाला जनतेने दिला कौल- तटकरे
  • १५ पैकी ११ ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व
  • अहमदनगर पाथर्डी ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व
  • आर्वी, आष्टी तालुक्यात
  • परभणीत ३ पैकी २ ठिकाणी भाजप विजयी
  • भंडाऱ्यात कॉंग्रेसचा पहिला उमेदवार विजयी
  • बीड-केज तालुक्यात ७ ग्रामपंचायती अजित पवारांच्या ताब्यात
  • वळसे पाटलांच्या गावात शिंदे गटचा सरपंच
  • इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचा पंधरावा निकाल हाती
  • सिंधुदुर्ग- वालावल ग्रामपंचायतीवर भाजपाचं वर्चस्व
  • परभणी जिल्ह्यात मविआचा एक विजय
  • रायगड-रोहा तालुक्यात अजित पवार गटाचे वर्चस्व
  • नागपुरात कॉंग्रेसची सत्ता उलथवून लावण्यात भाजपला यश
  • बारामतीत भाजपचा २ जागांवर विजय

 

११:४५ वाजेपर्यंत झालेले मतदान
भाजप शिंदे ठाकरे कॉंग्रेस शरद पवार अजित पवार इतर Total
१५१ ९८ ६० ६८ ५६ १२६ ८८ ६४७

 

महत्त्वपूर्ण घडामोडी:

  • शहादा तालुक्यात पहिला निकाल हाती
  • सोलापूर-करमाळा तालुक्यातल्या रायगावमध्ये शिंदे गटाची सत्ता
  • सोलापूर-करमाळा तालुक्यातल्या कोर्टीमध्ये भाजपची सत्ता
  • पंढरपूरच्या ईश्वर वठार ग्रामपंचायतीत भाजपाचा विजय
  • आटपाडीतल्या एका ग्रामपंचायतीत शिंदे गटाची सत्ता
  • नागपूर जिल्ह्यातील निकाल येण्यास सुरुवात
  • खाणगाव आणि लिंगा ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता
  • आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे
  • दहेगाव ग्रामपंचायतीत भाजपचा विजय
  • काटोलमध्ये अनिल देशमुखांना धक्का
  • आतापर्यंतच्या कालामध्ये सर्वाधिक जागा
  • अलका बापूसाहेब गायकवाड विजयी
  • नागपूर-कामठी तालुक्यातील बाबुलखेडा ग्रामपंचायत भाजपकडे
  • करंजगाव-धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय
  • अहमदनगर जिल्ह्यात निकाल येण्यास सुरुवात
  • ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचं शतक
  • नागपूरच्या कोलार गावात भाजपाची सत्ता

राज्यभर २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी (Grampanchayat Results) रविवार ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. २ हजार ९५० सदस्य पदे आणि १३० सरपंचाच्या रिक्त पदांसाठीही ही पोटनिवडणूक झाली. त्याची आज सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होत आहे. (Maharashtra) एकूण ग्रामपंचायती २३५९ आहेत. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी (७ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा कौल आज स्पष्ट होणार आहे.

राज्यातील नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची मतमोजणी विशेष महत्वाची ठरणार आहे.

9:43 वाजेपर्यंत झालेले मतदान – 
भाजप शिंदे ठाकरे कॉंग्रेस शरद पवार अजित पवार इतर Total
७० ५६ २३ २७ २० ७० २३ २८९

महत्त्वपूर्ण घडामोडी:

  • भाजप समर्थक आघाडीचं संपूर्ण पॅनेल विजयी
  • सोलापूर-उळे ग्रामपंचायतीत भाजपा विजयी
  • भाजपचे ११ सदस्य आणि सरपंच विजयी
  • जठारवाडी गाव स्थानिक आघाडीच्या ताब्यात
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का
  • कोल्हापूरच्या सांगवडेवाडीत सतेज पाटीलांची सत्ता
  • कोल्हापूर-पेरणोली ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडी
  • कोल्हापूर-शेणोली ग्रामपंचायती स्थानिक आघाडी
  • राधानगरी तालुक्यात राजश्री शाहू आघाडीचं वर्चस्व
  • कोल्हापूर न्यू-करंजे गावात शाहू आघाडीचं वर्चस्व
  • आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे

 

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.