Virat Kohli 49th Centuries : विराटने ४९ वं शतक झळकावताना मोडले फलंदाजीचे ‘हे’ विक्रम

विराट कोहलीने आपल्या ३५ व्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमधील आपलं ४९ वी विक्रमी शतक झळकावलं. त्याचवेळी फलंदाजीतील आणखीही काही विक्रम त्याने आपल्या नावावर केले आहेत

168
Virat Kohli 49th Centuries : विराटने ४९ वं शतक झळकावताना मोडले फलंदाजीचे ‘हे’ विक्रम

ऋजुता लुकतुके

रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११९ चेंडूत १०१ धावा करत विराट कोहलीने (Virat Kohli 49th Centuries) एकदिवसीय क्रिकेटमधील आपलं ४९ वं शतक ठोकलं. त्याबरोबरच विराटने सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ईडन गार्डन्स मैदानावर जमलेल्या जवळ जवळ ६०,००० प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा तो क्षण होता. शिवाय कोहलीचा ३५ वा वाढदिवस असल्यामुळे हे शतक आणखी विशेष होतं.

विराटच्या (Virat Kohli 49th Centuries) या कामगिरीमुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ बाद ३२६ अशी धावसंख्या उभारता आली. आणि पुढे गोलंदाजांनी भारताला अडीचशे धावांनी विजयही मिळवून दिला.

(हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवारांची राष्ट्रवादी बारामतीत विजयी !)

विराटने (Virat Kohli 49th Centuries) हे शतक करताना आणखीही काही फलंदाजीचे विक्रम मोडले आहेत. त्यांची यादीही बरीच मोठी आहे. त्यावर एक नजर टाकूया…

– विराट कोहलीने पहिल्यांदा एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

– सचिन तेंडुलकर नंतर विश्वचषक स्पर्धेत एकूण १,५०० धावांचा टप्पा पार करणारा विराट दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे

– सचिन तेंडुलकर नंतर दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध ३,००० पेक्षा जास्त धावा करणारा विराट दुसरा भारतीय ठरला आहे

– कोहलीने आता भारतात ६,००० च्या वर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या बाबतीतही तो सचिन तेंडुलकर नंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे

– विराटने आपलं ४९ वं आंतरराष्ट्रीय शतक २७७ व्या इनिंगमध्ये केलं. तर सचिनने त्यासाठी ४५२ इनिंग घेतल्या होत्या. विराट त्याबाबतीत सचिनपेक्षा सरस
ठरला आहे. (Virat Kohli 49th Centuries)

– विराट कोहली हा विनोद कांबळी (१००) आणि सचिन तेंडुलकर (१३४) नंतर वाढदिवशी शतक ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज आहे

– विराट कोहली (११९) पन्नास पेक्षा जास्त धावा सगळ्यात जास्त वेळा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. ४९वं शतक झळकावताना या बाबतीत त्याने
श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकलं आहे. कुमार संगकाराने ११८ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आता विराटच्या पुढे फक्त सचिन (१४६)
आहे.

– विश्वचषक स्पर्धेतील विराटचं हे चौथं शतक ठरलंय.

– विराट कोहलीने आता आपल्या शेवटच्या १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,०९१ धावा केल्या आहेत. आणि यात त्याची सरासरी आहे १०९ धावांची. एका वर्षांत १००० धावा करण्याची कामगिरी त्याने विक्रमी ८ वेळा केली आहे. (Virat Kohli 49th Centuries)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.