पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे मार्गावर दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष रेल्वे (Special Railway) रविवारपासून सुरू झाली. येत्या १० ते १५ दिवस रेल्वेचे बुकिंग चांगले झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर पूर्वी सह्याद्री एक्स्प्रेस धावत होती. करोनाकाळात ती बंद करण्यात आली. ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. खासदारांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीतही धनंजय महाडिक यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित करून रेल्वे सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वेळी रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आता कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर अशी विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान ही विशेष रेल्वे धावणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचा –Virat Kohli 49th Centuries : विराटने ४९ वं शतक झळकावताना मोडले फलंदाजीचे ‘हे’ विक्रम )
Join Our WhatsApp Community