Kerala : भीतीच्या सावटाखाली आहे केरळमधील हिंदू जनजीवन

169
  • आचार्य पीपीएन् नायर

जगभरात आतंकवाद चालू आहे. केरळ (Kerala) मध्ये परिस्थिती अशी आहे की, कम्युनिस्ट पार्टीचे डावे सरकार जिहाद्यांना मिळालेले आहे. मल्लपुरम येथे झालेल्या रॅलीत ‘हिंदुत्व नष्ट करायचे आहे’, असे जिहाद्यांनी उघडपणे म्हटले आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारमधील सर्व नेते जिहादी आतंकवाद्यांना सामील झाले आहेत. त्यांनी हिंदुत्व नष्ट करण्याचे षडयंत्र रचले आहे. केरळमधील हिंदूंची स्थिती अत्यंत कठीण आहे.

कपाळावर टिळाही लावू शकत नाही 

देशात अन्य राज्यांमध्ये हिंदू ज्याप्रमाणे धर्माचरण करू शकतात, तशी स्थिती केरळमध्ये नाही. टिळा लावून घराबाहेर पडणाऱ्या हिंदूंना खुलेआम मारझोड होते. मंदिरे किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाणाऱ्या हिंदूंना मारहाण होते. केरळमधील काही स्थानांवर हिंदूंना सण-वार साजरे करण्यास परवानगी नाकारलेली आहे. ‘येथे सण साजरे करू नका’, असे त्यांना उघडपणे सांगितले जाते. भगवा झेंडा लावण्यासही विरोध केला जातो. आता तर सरकारने जाहीरपणे सांगितले आहे की, भगवा झेंडा लावायचा असेल, तर त्याबाजूला हिरवा झेंडाही लावावा लागेल.

मंदिरे हडप करून श्रद्धांचे भंजन 

सरकारने येथील सर्व मंदिरे हडपली आहेत. केरळ (Kerala)मध्ये अनेक प्राचीन आणि पुरातन मंदिरे आहेत. त्या मंदिरांवर नियंत्रण मिळवून येथील साम्यवादी सरकारने मंदिरांतील प्राचीन सोने हडपले आहेत. मंदिरांच्या पवित्र तळीमध्ये दैवी मासे असतात, अशी हिंदूंची मान्यता आहे. त्या माशांना भाविक खाद्य देतात. त्या तळी कह्यात घेऊन तेथे मत्स्यपालन व्यवसाय केला जात आहे.

सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला चुकवावी लागते किंमत 

देशभरात होत नाहीत, त्याच्या अनेक पट हिंदूविरोधी कारवाया सध्या केरळमध्ये चालू आहेत. मोगल आणि ब्रिटिशांच्या काळातही जेवढे हिंदूंवर अत्याचार झाले नसतील, तेवढे अत्याचार सध्याच्या स्थितीत केरळमध्ये चालू आहेत. सरकारच्या धोरणाविरोधात बोलणारा, न्यायालयात  याचिका करणारा पुढच्या २-३ दिवसांत कोणत्या तरी दुर्घटनेत मृत्युमुखी पडतो. त्याच्यामागे रहाणाऱ्या कुटुंबियांनाही त्रास दिला जात आहे. हे कोणतेही गुपित नाही. हे सर्व जगाला माहीत आहे. उघडपणे सर्व केले जाते. १५-२० वर्षांपूर्वी केरळ (Kerala) हे अत्यंत शांत राज्य होते. ही स्थिती गेल्या २ दशकांत निर्माण झाली आहे.

(लेखक केरळीय परिपालन समितीचे अध्यक्ष आहेत.) 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.