दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर आलेला असताना अद्यापही मुंबई महापालिकेच्या कामगारांच्या सानुग्रह अनुदान बाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवून देणार की आहे तेवढीच देणार याबाबत कुठेच स्पष्टता नाही. त्यामुळे काही तो निर्णय घ्या या मानसिकतेत कामगार वर्ग असून याचा निर्णय घेण्यास ना मुख्यमंत्र्यांना वेळ आहे ना, त्यांच्या बैठकी शिवाय यावर निर्णय घेण्याची महापालिका आयुक्तांची इच्छा आहे. त्यातच मुख्यमंत्री दोन दिवस मुंबई बाहेर आहेत, त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री आणि महापालिका प्रशासन काय निर्णय देतात आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात कधी या सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा होते याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे. (MCGM)
मुंबई महापालिका कामगार कर्मचाऱ्यांना मागील दीपावलीची भेट म्हणून २२ हजार ५०० रूपये एवढी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात विद्यमान मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु यंदा दीपावलीच्या सणाला पाच दिवस शिल्लक राहिले असून प्रत्यक्षात दिवाळी भेटीच्या रकमेची घोषणा अद्याप झाली नाही. त्यामुळे कधी ही घोषणा आणि कधी हे पैसे खात्यात जमा होऊन कामगारांना खरेदी करता येईल. (MCGM)
(हेही वाचा – Kerala : गेल्या काही दशकांत केरळमधील हिंसाचारात वाढ)
काही कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यंदा ५० हजार एवढी दिवाळी भेट मिळावी म्हणून मागणी केली आहे. परंतु २०२१ मध्ये तत्कालीन ठाकरे सरकारने १५,५०० रुपयांवरून ही रक्कम वाढवून २० हजार रुपये एवढी करून ती सन २०२३ पर्यंत राहील असे जाहीर केले होते. पण त्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा करार मोडून २२,५०० एवढी रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यामूळे यंदाही अडीच हजारांची वाढ गृहीत धरल्यास यंदा २५,००० रुपये दिवाळी भेट मिळेल असा अनुमान लावला जात असला तरी काही तो एकदा निर्णय घ्या आणि द्या एकदाची रक्कम असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे या पूर्वी सानुग्रह अनुदान देण्यास विलंब झाल्यास कामगार संघटना आंदोलन करायची, पण यंदा ते चिडी चूप बसल्याने एकाही कामगार संघटनेला यातील रक्कम कापून दिली जाऊ नये तथा आम्ही देणार नाही असा निर्धार कामगारांनी घेतला असल्याची माहितीही मिळत आहे. (MCGM)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community