-
ऋजुता लुकतुके
पाक संघाने न्यूझीलंड विरुद्धचा सामना डकवर्थ-लुईस नियमांच्या मदतीने जिंकला आणि त्यानंतर ८ सामन्यात ८ गुण मिळून ते पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत ते पुन्हा एकदा भारतासमोर येतील अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. पण, ती शक्यता नेमकी किती आहे? (ICC World Cup)
फखर झमानच्या खणखणीत शतकामुळे पाकिस्ताने न्यूझीलंडचं ४०२ धावांचं आव्हानही धैर्याने पेललं. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे दोनदा पाकिस्तानसमोरचं लक्ष्य डकवर्थ-लुईस नियमानुसार थोडं कमी झालं. त्याचाही मदत त्यांना मिळाली. ड्कवर्थ-लुईस नियमानुसार सामना पावसामुळे रद्द झाला तेव्हा पाक संघ २१ धावांनी पुढे होता. (ICC World Cup)
पावसाने मदत केली हे खरं असलं तरी ज्या जोमाने पाक संघ खेळला, त्याचंही कौतुक होतंय. खासकरून झखर इमानच्या ८१ चेंडूंत नाबाद १२६ धावांच्या खेळीमुळे तर सोशल मीडिया बेभान झाला आहे. त्याच्या या खेळीमुळेच पाकचा संघ २५ षटकांत १ बाद २०० धावांवर पोहोचला आणि पुढे जोरदार पाऊस झाला तरी डकवर्थ-लुईस नियमांत ते पुढे होते. (ICC World Cup)
या विजयामुळे पाक आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आता प्रत्येकी ८ गुणांवर आहेत. दोघांनी समान ८ सामने खेळले आहेत. तर अफगाणिस्तान हा आणखी एक संघ ८ गुणांवर आहे आणि त्यांचे अजून दोन सामने बाकी आहेत. अशावेळी पाकचा संघ कुठल्या परिस्थितीत उपांत्य फेरी गाठू शकतो ते पाहूया… (ICC World Cup)
पहिली शक्यता
पाकिस्तानचा शेवटचा साखळी सामना इंग्लंड बरोबर ११ नोव्हेंबरला आहे. तर न्यूझीलंडचा उर्वरित साखळी सामना ९ नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध आहे. अफगाणिस्तानचे उर्वरित सामने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तगड्या संघांबरोबर आहेत. (ICC World Cup)
न्यूझीलंडचा सामना पाकच्या साखळी सामन्याच्या दोन दिवस आधी आहे. त्यांनी लंकेविरुद्ध विजय मिळवला आणि पाकनेही इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकला, तर नेट रनरेटवरून पुढे जाणाऱ्या संघाचा फैसला होईल. पण, इथं पाकचा सामना नंतर असल्यामुळे त्यांना नेमका किती फरकाने सामना जिंकायचा आहे हे गणित समोर ठेवून विजयासाठी प्रयत्न करता येईल. (ICC World Cup)
अर्थात, तिसरा संघ अफगाणिस्तान आपले दोन्ही सामने हरला तरंच हे शक्य आहे. अफगाणिस्तानने एक जरी सामना जिंकला तर त्यांच्याबरोबर नेट रनरेटची तुलना होईल. (ICC World Cup)
(हेही वाचा – Virat Kohli 49th Centuries : ‘मी काही गोट नाही,’ विराटची विक्रमी ४९व्या शतकानंतर प्रतिक्रिया)
दुसरी शक्यता
न्यूझीलंड आणि पाकने आपापले सामने जिंकले आणि अफगाणिस्तानने उर्वरित दोन सामने गमावले. तर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातच स्पर्धा होईल. अशावेळी न्यूझीलंडचा आताचा नेट रनरेट आहे ०.३९८. जो पाकिस्तान (०.०३६) पेक्षा सरस आहे आणि अफगाणिस्तानचा रनरेट सध्या उणे ०.३३० इतका आहे. पाकिस्तानला अशा परिस्थितीत न्यूझीलंड पेक्षा जास्त रनरेट राखावा लागेल आणि त्यासाठी गणितच मांडावं लागेल. पाकिस्तान समोरचं गणित अवघड आहे. पण, त्यांच्यापाशी संधीही आहे. (ICC World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community