Dasara Wishes In Marathi : स्वत:कडे पहाण्याचा सकारात्मक संदेश देणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा

289
Dasara Wishes In Marathi : स्वत:कडे पहाण्याचा सकारात्मक संदेश देणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा
Dasara Wishes In Marathi : स्वत:कडे पहाण्याचा सकारात्मक संदेश देणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा

दसऱ्याची सकाळच inbox भरून शुभेच्छांनी होते. (Dasara Wishes In Marathi) आपल्या परिचितांना, अगदी कधीतरी-कुठेतरी भेटलेल्यांनाही या निमित्ताने शुभेच्छा दिल्या जातात. एरव्ही प्रत्येकच सणाला विशेष शुभेच्छा दिल्या जातात. दसरा या सणाचे औचित्यच वेगळे आहे. चांगल्याचा वाईटावर विजय होतोच, असा संदेश हा सण देतो. या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांनाही सकारात्मकतेची आणि लढाऊ वृत्तीची किनार असते.

इतरांच्या आयुष्यात सुखाची कामना

‘आला आला दसरा, दुःख आता विसरा चेहरा ठेवा हसरा, साजरा करू दसरा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा’, ‘झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा’ यांसारख्या शुभेच्छांतून इतरांच्या आयुष्यात सुखाची कामना केली जाते. इतरांना हसत-खेळत रहाण्यास प्रोत्साहित केले जाते. (Dasara Wishes In Marathi)

(हेही वाचा – Cache For Query Case : महुआ यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची शक्यता; आचार समितीची मंगळारी महत्वाची बैठक)

आयुष्यातील नव्या आव्हानांसाठी प्रेरणा

‘उस्तव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा.. नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा.. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा’, ‘पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला, पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत नव्या शुभेच्छा’ यांसारख्या शुभेच्छा इतरांचे यश, त्यांच्या आयुष्यातील नव्या आव्हानांसाठी प्रेरित करतात.

संकटावर मात करण्याचा संदेश

‘जल्लोष विजयाचा, मुहूर्त एक सण दसऱ्याचा’, ‘दसरा हे विजयाचे प्रतीक आहे, असेच आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर आपण विजय मिळवावा’, यांसारख्या अनेक शुभेच्छा संदेशांतून खेळी-मेळीने, लढाऊ वृत्तीने संकटावर मात करण्याचा संदेश दिला जातो. (Dasara Wishes In Marathi)

स्वत:तील दुर्गुणरूपी रावणाचे दहन

दसऱ्याच्या दिवशी रावणदहन केले जाते. या दिवशी स्वत:तील दुर्गुणरूपी रावणाचे दहन करणे, हा खरा स्वत:वर विजय आहे. या निमित्ताने स्वत:तील उणिवांकडे अंतर्मुखपणे पहाण्याची प्रेरणा मिळते.

दसरा या सणाचाच भाग असलेल्या या शुभेच्छांमागे खरेच सदिच्छा दडलेल्या असतात. खरे तर दसऱ्याच्या दिवशी शेकडो शुभेच्छांची देवाण-घेवाण चालू असते. साधारणतः व्यवहार म्हणून एका ग्रुपवरून आलेल्या शुभेच्छा दुसऱ्या ग्रुपवर फॉरवर्ड केल्या जातात. दसऱ्याच्या शुभेच्छांमागील हा आशय समजून घ्या. केवळ औपचारिकता म्हणून शुभेच्छांचे मेसेज फाॅरवर्ड न करता त्यांचा आशय नक्की समजून घ्या ! (Dasara Wishes In Marathi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.