आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर (Sri Lanka Cricket Board) श्रीलंकेच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार ६ नोव्हेंबर रोजी लंकेच्या सरकारने श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) मंडळाला बरखास्त केले आहे.
भारताविरुद्ध तब्बल 302 धावांनी पराभव, त्यातच विश्वचषकातून (Sri Lanka Cricket Board) बाहेर पडल्याने, श्रीलंकंन प्रशासनाने हे पाऊल उचललं. सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. श्रीलंकेंने विश्वचषकात अतिशय निराशाजनक कामगिरी केली.
श्रीलंकेच्या या वाईट कामगिरीमुळे त्यांच्या देशात निदर्शने सुरु झाली आहेत. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने याबाबत निवड समितीला जाब विचारलाच, पण आता त्यापुढे जात थेट क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा – MCGM : ना मुख्यमंत्र्यांना वेळ ना महापालिका आयुक्तांना; पाच दिवस उरले तरी दिवाळी भेट बाबत निर्णय नाही)
लंकेच्या (Sri Lanka Cricket Board) पराभवानंतर सिल्वा प्रशासनाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एसएलसी आवारासमोर अनेक निदर्शने करण्यात आली. इमारतीच्या संरक्षणासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते.
कार्यवाहक कर्णधार कुसल मेंडिसने (Sri Lanka Cricket Board) खुलासा केला की, मुंबईत भारताच्या 8 बाद 357 धावांच्या प्रत्युत्तरात 55 धावांवर बाद झाल्यानंतर टीमच्या लाजिरवाण्या पराभवानंतर तो ‘दुःखी’ होता. “जेव्हा आपण प्रत्यक्षात मागील सामन्याबद्दल बोलतो, तेव्हा मला त्याबद्दल खूप वाईट वाटते. आणि म्हणूनच त्या मागील सामन्याबद्दल विचार करणे आमच्यासाठी कठीण आहे. या स्पर्धेत अजून दोन सामने बाकी आहेत. एक संघ म्हणून आम्ही आमच्या कमतरता ओळखल्या आहेत आणि आता आमचे लक्ष आगामी सामन्यांवर आहे, असे मेंडिसने सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community