Gram panchayat Election Result : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीत तेलंगणातील बीआरएसची एन्ट्री

148
Gram panchayat Election Result : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीत तेलंगणातील बीआरएसची एन्ट्री

तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतीचा (Gram Panchayat Election Result) निकाल सोमवारी(६नोव्हेंबर) लागला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह आता बीआरएस पक्षालाही ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले आहे. भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएस पक्षाने झेंडा रोवला आहे. तर बीडमधील रेवती देवकी ग्रामपंचायतही ताब्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाला १० ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळाला आहे.

 विशेष म्हणजे तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्ताकारणात चंचुप्रवेश केला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह आता बीआरएस पक्षानेही यश मिळवत आपली उपस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दाखवली आहे.

(हेही वाचा : Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर एक; केशव उपाध्ये यांची माहिती)

भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएसचा झेंडा 

भंडारा जिल्ह्यातील ६६ पैकी २० ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. भंडाऱ्यात आतापर्यंत बीआरएस पक्षाने बाजी मारली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला पक्षाडत बीआरएस पक्षानं आतापर्यंत भंडाऱ्यातील ९ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाला आतापर्यंत दोन दोन ग्रामपंचयतीमध्ये विजय मिळवता आला आहे . तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एका ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळला आहे.

बीडमध्ये एक ग्रामपंचायत बीआरएसकडे
बीडमध्येही बीआरएस पक्षाने विजय मिळवला आहे. गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीवर बीआरएसने झेंडा फडकावला आहे. शशिकला भगवान मस्के या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

के चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्राला पसंती 
के चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरुवात केली. आषाढी एकादशीला तेलंगणामधून तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात ग्रँड एंट्री केली. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात राज्यातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला होता. चंद्रशेखर राव यांनी मागील काही दिवसात महाराष्ट्रात अनेक सभा घेत शेतकऱ्यांना अश्वासने दिली आहेत . त्याशिवाय सत्ताधारी भाजपवर त्यांनी टीकाही केली. केसीआर यांनी मराठवाड्यातील नांदेड येथून महाराष्ट्रात प्रचाराला सुरूवात केली होती, नांदेड येथे घेतलेल्या सभेत त्यांनी अबकी बार किसान की सरकार अशी घोषणा दिली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.