Heeralal Samariya : हिरालाल समरिया बनले मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

देशाचे १२वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हीरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे.

144
Heeralal Samariya : हिरालाल समरिया बनले मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
Heeralal Samariya : हिरालाल समरिया बनले मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

देशाचे १२वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त हिरालाल समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी दिली. हिरालाल समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. (Heeralal Samariya)

हिरालाल समरिया यांच्या विषयी

हिरालाल समरिया यांचा जन्म राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील पहाडी या दुर्गम आणि लहान गावात झाला. ते १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, राष्ट्रपती भवनात सकाळी १० वाजता झालेल्या समारंभात हिरालाल समरिया यांना केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ देण्यात आली. वाय. के. सिन्हा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या मुख्य माहिती आयुक्त पदावर हिरालाल सामरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. (Heeralal Samariya)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला)

हिरालाल समरिया यांची कारकिर्द

हिरालाल समरिया यांचा जन्म १४ सप्टेंबर १९६० रोजी राजस्थानमधील भरतपूरजवळील पहाडी या छोट्याशा गावात झाला. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून बीई सिव्हिल (ऑनर्स) चे शिक्षण घेतले. आत्तापर्यंत ते कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव आणि अतिरिक्त सचिव पदावर काम केले आहे. रसायने आणि खते मंत्रालयातील सहसचिव, तसेच तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातही त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. (Heeralal Samariya)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.