Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीची सरशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले जनतेचे आभार

135
Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीची सरशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले जनतेचे आभार
Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीची सरशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले जनतेचे आभार

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पार पडली आहे. (Gram Panchayat Elections) ग्रामपंचायत निवडणुका थेट राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढविल्या जात नसल्या, तरी अनेक ठिकाणी महायुतीचीच सरशी झाल्याचे चित्र आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या कामांची पोचपावती जनतेने दिली असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. असेच यश महायुतीला येत्या लोकसभा निवडणुकांत देखील मिळणार असून ‘४५ पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याही गटाला उल्लेखनीय यश मिळाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे. भाजपने केलेले दावे साफ खोटे असून हिम्मत असेल, तर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान दिले आहे. (Gram Panchayat Elections)

(हेही वाचा – Dasara Wishes In Marathi : स्वत:कडे पहाण्याचा सकारात्मक संदेश देणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा)

महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट करणा-या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक रविवारी पार पडली. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदांसाठीच्या निवडणुकाही सोबतच पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल सोमवारी लागले. या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हांवर लढल्या जात नाहीत. मात्र स्थानिक पातळीवर विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच या निवडणुका लढवत असतात. त्यामुळे या निवडणुकांना राजकीय रंग येतोच. या निकालांमध्ये भाजपने आपल्यालाच सर्वांत जास्त जागा मिळाल्याचा दावा केला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालावरून २१० ग्रामपंचायती जिंकत भाजपच नंबर एकचा पक्ष ठरला आहे, असे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले. (Gram Panchayat Elections)

”महायुती सरकारच्या विकासकार्यावर मतदार समाधानी असून मतदारांनी सरकारवर विश्वास दाखवत ७२३ पैकी तब्बल ४४१ ठिकाणी महायुतीला विजय मिळवून दिला आहे. वेळोवेळी विरोधकांकडून आणि विशेषकरून संजय राऊत यांच्याकडून “निवडणुका एकदा घेऊनच बघा मग चित्र स्पष्ट होईल”, असे आव्हान दिले जात होते. राऊत यांच्यासारख्या नेत्यांना या निकालाने सणसणीत चपराक लगावली आहे. हाती आलेल्या ७२३ जागांच्या निकालांमध्ये भाजपला २१० जागा, अजित पवार गटाला १२१ जागांवर, तर शिंदे गटाला ११० जागांवर विजय प्राप्त झाला आहे.  दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला ६५ ठिकाणी, कॉंग्रेसला ५१ ठिकाणी, तर उद्धव टाकरे गटाला जेमतेम ३४ ठिकाणी यश मिळाल्याचे उपाध्ये म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मानले जनतेचे आभार

महायुती सरकारमध्ये गेल्या वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने थांबवलेली कामे व थांबवलेल्या प्रकल्पांना पुन्हा एकदा चालना देण्याचे काम आम्ही केले. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण आम्ही आखले आणि तशी भूमिका आम्ही घेतली. राज्यातील सर्वसामान्य माणूस मग अगदी शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, महिलांपासून तरुण वर्गापर्यंत, ज्येष्ठांपासून कामगारांपर्यंत सर्वांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले. ग्रामपंचायत निवडणुकीतील निकाल आणि मतदारांनी महायुती सरकारवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. (Gram Panchayat Elections)

या आधी महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षाची सुमार कामगिरी जनतेने पहिली. आमचे महायुती सरकार आल्यानंतर दररोज आमच्यावर टोमणे, आरोप-प्रत्यारोप करण्यात संपूर्ण वर्ष घालवले. विरोधकांनी आमच्या सरकारवर टीकाटिप्पणी आरोप केला नाही, असा एकही दिवस गेला नाही. ज्या लोकांनी मतदारांशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, अशा लोकांना जनतेने नाकारले, त्यांना घरी बसवले आणि आमच्या महायुती सरकारला कौल दिला. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी आपल्या मतांनी दाखवून दिले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. (Gram Panchayat Elections)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.