Asian Champions Trophy : जपानचा ४-० ने पराभव करत भारतीय महिलांनी पटकावलं विजेतेपद

भारतीय महिला हॉकी संघाने जपानचा ४-० असा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. महिलांचा आक्रमक खेळ नजरेत भरण्यासारखा होता आणि संपूर्ण खेळावर भारतीय महिलांचंच वर्चस्व होतं

169
Asian Champions Trophy : जपानचा ४-० ने पराभव करत भारतीय महिलांनी पटकावलं विजेतेपद
Asian Champions Trophy : जपानचा ४-० ने पराभव करत भारतीय महिलांनी पटकावलं विजेतेपद
  • ऋजुता लुकतुके

भारतीय महिला हॉकी संघाने जपानचा ४-० असा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. महिलांचा आक्रमक खेळ नजरेत भरण्यासारखा होता आणि संपूर्ण खेळावर भारतीय महिलांचंच वर्चस्व होतं. (Asian Champions Trophy)

आशियाई चॅम्पियन्स महिला हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी रात्री ५० मिनिटं उशिरा सुरू झाली. कारण, रांचीच्या स्टेडिअममध्ये फल्ड लाईट्स पूर्ण क्षमतेनं सुरू होत नव्हते. पण, याचा कुठलाही विपरित परिणाम खेळावर होऊ न देता, भारतीय महिलांनी सामन्यात पहिल्या सेकंदापासून आक्रमण सुरू केलं आणि परिणामी ठरावीक अंतराने गोल करत जपानचा ४-० असा धुव्वा उडवला. आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेचं भारताचं हे दुसरं विजेतेपद आहे. (Asian Champions Trophy)

सामन्याच्या १७व्या मिनिटालाच संगीता कुमारीने संघासाठी पहिला गोल केला आणि त्यानंतर नेहा, लेरेमसियामी आणि वंदना कटारिया यांनी लागोपाठ गोलचा धडाका लावला आणि जपानला या सामन्यात संधीही दिली नाही. यापूर्वी २०१६ मध्ये भारताने ही स्पर्धा जिंकली होती. (Asian Champions Trophy)

यंदा मात्र जपान गतविजेते होते. पण, भारताने त्यांना साखळी आणि पुन्हा अंतिम फेरीत हरवण्याची किमया केली. सुरुवातीपासूनच आक्रमणाच्या मूडमध्ये असलेल्या भारतीय संघाला पहिल्या काही मिनिटांतच गोल करण्याची संधी मिळाली होती. पण, दीपिका कुमारीचा फटका दिशाहीन ठरला. (Asian Champions Trophy)

पण, त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये दुसऱ्याच मिनिटाला सरिता कुमारीने कुठलीही कसूर केली नाही. नेहा गोयलच्या पासवर उंच फटका मारून सरिताने काम फत्ते केलं. पहिल्या यशानंतर भारतीय खेळाडूंचा आक्रमक बाणा सुरूच राहिला. पण, गोल म्हणावे तसे होत नव्हते. (Asian Champions Trophy)

(हेही वाचा – Heeralal Samariya : हिरालाल समरिया बनले मुख्य माहिती आयुक्त; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ)

उलट जपानी खेळाडू बचावावर भर देत होते आणि अधून मधून प्रतिआक्रमण करत होते. पण, भारतीय बचाव सक्षम असल्यामुळे त्यांचे गोल झाले नाहीत. तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये जपानने केलेला गोल भारताच्या अपीलनंतर फेटाळावा लागला. कारण, हा फटका खेळताना जपानची खेळाडू शिहोची भारतीय खेळाडूशी टक्कर झाली होती. (Asian Champions Trophy)

त्यानंतर जपानला दोन पेनल्टी कॉर्नरही मिळाले. पण, ते गोल करू शकले नाहीत. उलट भारतीयांनी पुढील प्रत्येक क्वार्टरमध्ये गोल करत ४-० अशी मजल मारली. या विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. ते अपयश थोडंफार धुवून निघालं आहे. (Asian Champions Trophy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.