Shivaji Maharaj Statue at Indo-Pak Border : भारत-पाक सीमेवर आता शिवाजी महाराजांची शौर्यगाथा; वाढला महाराष्ट्राचा गौरव

107
Shivaji Maharaj Statue at Indo-Pak Border : भारत-पाक सीमेवर आता शिवाजी महाराजांची शौर्यगाथा; वाढला महाराष्ट्राचा गौरव
Shivaji Maharaj Statue at Indo-Pak Border : भारत-पाक सीमेवर आता शिवाजी महाराजांची शौर्यगाथा; वाढला महाराष्ट्राचा गौरव

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. (Shivaji Maharaj Statue at Indo-Pak Border) यावेळी एकनाथ शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंदही घेणार आहेत.

आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीर मधील कुपवाडा येथे बसविण्यासाठी आला आहे. २० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईतील राजभवन येथील समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले होते. तेथून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवा झेंडा दाखवून कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला होता. (Shivaji Maharaj Statue at Indo-Pak Border)

(हेही वाचा – Gram panchayat Election Result : महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीत तेलंगणातील बीआरएसची एन्ट्री)

महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास सुमारे २ हजार २०० किमी अंतर पार करीत एका आठवड्यात कुपवाडा येथे पोहोचला. रस्त्यातील महत्वाच्या शहरांमधील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी या पुतळ्याचे पूजन करतानाच स्वागतही करण्यात आले. आज सकाळी दहाच्या सुमारास या पुतळ्याचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Shivaji Maharaj Statue at Indo-Pak Border)

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमिपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशीच करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती. हा पुतळा साडेदहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ बाय ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.

पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशापद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १ हजार ८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे. (Shivaji Maharaj Statue at Indo-Pak Border)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.