-
ऋजुता लुकतुके
पंजाब नॅशनल बँकेनं आपली दिवाळी धमाका योजना जाहीर केली आहे आणि यात नवीन कर्जधारकांना ८.४० टक्के दरानेही गृहकर्ज मिळू शकेल. (PNB Diwali Bonanza)
दिवाळीचा सण लक्षात घेऊन अनेक बँकांनी आपल्या सवलत योजना जाहीर केल्या आहेत. यातीलच एक आहे पंजाब नॅशनल बँक ही आघाडीची सरकारी बँक कंपनी. त्यांनी दिवाळी धमाका योजना जाहीर केली आहे. फेस्टिव्हल बोनान्झा ऑफर अंतर्गत दिवाळी धमाका २०२३ ही योजना येते आणि यात ग्राहकांना गृहकर्जाच्या व्याजदरावर बँकेनं सवलत देऊ केली आहे. (PNB Diwali Bonanza)
(हेही वाचा – Purnima In Marathi : जाणून घ्या ’पौर्णिमा’बद्दल १० महत्त्वाची तथ्ये)
या योजनेअंतर्गत नवीन कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना गृह आणि करावरील कर्जं ही ८.४० टक्के आणि ८.७५ टक्के या दरांपासून मिळू शकतील. याशिवाय ग्राहकांना प्रक्रिया शुल्क तसंच कुठलंही दस्तऐवजीकरणाचं शुल्क भरावं लागणार नाही. अर्थात, या योजनेत काही नियम व अटी बँकेनं लावल्या आहेत आणि त्याची नीट माहिती घेण्यासाठी बँकेनं नजीकच्या बँकेच्या शाखेतून माहिती घेण्याचं आवाहन केलं आहे. (PNB Diwali Bonanza)
किंवा ग्राहक टोल-फ्री क्रमांक १८०० १८००/१८०० २०२१ किंवा पीएनबीच्या जवळच्या शाखेद्वारे बँकेशी संपर्क साधू शकतात. ग्राहक मोबाईल बँकिंग अँप पीएनबी वन वर लॉग इन करून किंवा https://www.pnbindia.in/ वर जाऊन माहिती मिळवू शकतात. गृहकर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ वर लॉग इन करू शकतात. (PNB Diwali Bonanza)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community