Golden Rashi Bhavishya : व्यक्तिगत आयुष्याच्या विकासासाठी राशी भविष्याचा कसा लाभ करून घ्याल?

1409

काळ परिवर्तनशील आहे; त्यामुळे परिस्थितीही परिवर्तनशील आहे. कोणतीही चांगली किंवा वाईट परिस्थिती कायमस्वरूपी टिकत नाही. त्याचप्रमाणे जन्मकुंडलीत असणार्‍या शुभ किंवा अशुभ ग्रहयोगांचे फळ जीवनभर एकसारखे मिळत नाही. ते फळ विशिष्ट कालावधीत प्रकर्षाने मिळते. ज्योतिषशास्त्रात (Golden Rashi Bhavishya) कालनिर्णयाच्या विविध पद्धती आहेत. या पद्धतींद्वारे आपल्या जीवनातील विशिष्ट काळ कोणत्या गोष्टींसाठी अनुकूल किंवा प्रतिकूल राहील, याचा बोध होतो.

ज्योतिषशास्त्रामुळे शुभाशुभ दिवसांचे ज्ञान होते

‘काळाचा प्रभाव ओळखणे’, या उद्देशाच्या पूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली. ज्योतिषशास्त्रामुळे शुभाशुभ दिवसांचे ज्ञान होते. भारतात वैदिक काळापासून महत्त्वाची कार्ये आणि धार्मिक संस्कार शुभ मुहूर्तांवर करण्याची परंपरा आहे. ‘काळानुरूप केलेल्या कार्यात यश मिळते’, हा त्यामागील दृष्टीकोन आहे. जीवनातील कोणत्याही समस्येमागे शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक कारणे असतात. समस्यांमागील शारीरिक आणि मानसिक कारणे बुद्धीला कळतात आणि त्यावरील उपाययोजना व्यवहारात उपलब्ध असतात. समस्यांमागील आध्यात्मिक कारणे मात्र बुद्धीला कळत नाहीत, उदा. अतृप्त पूर्वजांचा त्रास, सूक्ष्मातील वाईट शक्तींचा त्रास, प्रारब्ध आदींमुळे उद्भवलेल्या विविध समस्या. अशा समस्यांवर शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील उपाययोजना अवलंबण्यास मर्यादा येते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रातून संभाव्य समस्या, संकटांचे आकलन होते, तेव्हा त्यावर देवतांचा नामजप करणे, धार्मिक विधी करणे, तीर्थक्षेत्री जाणे, संतसेवा करणे, प्रायश्चित्त घेणे इत्यादी आध्यात्मिक स्तरावरील उपाय लागू पडतात. जन्मकुंडलीद्वारे व्यक्तीच्या समस्येमागील आध्यात्मिक कारण लक्षात येते आणि त्या अनुषंगाने आध्यात्मिक स्तरावरील उपायांचा अवलंब करण्याविषयी दिशादर्शन करता येते.

(हेही वाचा Bombay High Court : …तर चार दिवसांनंतर मुंबईतील बांधकामांवर बंदी घालू; मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा)

समस्यांचे आगाऊ आकलन होणे सर्वांनाच आवश्यक वाटते

म्हणून जीवनात येऊ घालणाऱ्या समस्यांचे आगाऊ आकलन होणे सर्वांनाच आवश्यक वाटत असते, त्यासाठी ज्योतिष, राशी भविष्य (Golden Rashi Bhavishya) एक प्रभावी माध्यम आहे. ज्याच्या माध्यमातून संभाव्य संकटांचा वेध घेऊन त्यानुसार त्या समस्यांवर उपाय शोधल्याने केव्हाव्ही समस्यांची झळ अधिक तीव्र पणे जाणवत नाही. म्हणून आयुष्यात शुभ कार्य करायचे असेल तर त्यासाठी ग्रहमान अनुकूल आहेत का, हे पाहणे गरजेचे असते, त्यासाठीच ज्योतिषशास्त्र उपयोगी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.