एके काळी शिवसेना पक्षातून निवडणूक लढविणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आता ठाकरे गटाच्या (उबाठा) आमदारांविरोधात निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केलीय. अंधेरीत कार्यालयाचे उद्घाटनवेळी प्रदीप शर्मा यांनी मी मागील आठ वर्षापासून समाजकारणात आहे. अंधेरीकरांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. नागरिकांनी त्या समस्या लेखी स्वरूपात या कार्यालयात द्याव्यात. अंधेरी पूर्वेकडील मरोळ मरोशी रोड परिसरात प्रत्येक वार्डात कार्यालय उभारणार आहे. प्रत्येक वार्डातील कार्यालयात आठवड्यातून एकदा भेट देणार आहे. सध्या मी कोणत्याही पक्षात नाही. पण, जनतेची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवू शकतो असे महत्वाचे विधान केले. (Pradeep Sharma)
(हेही वाचा – Asian Champions Trophy : जपानचा ४-० ने पराभव करत भारतीय महिलांनी पटकावलं विजेतेपद)
अंधेरी पूर्व मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना पक्षाने संधी दिली. तर, भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी ऋतुजा लटके यांच्याविरोधात निवडणुकीसाठी दंड थोपटले होते. मात्र, ऐनवेळी पक्षाने त्यांची उमेदवारी मागे घेतली होती. तसे पाहता प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. याआधी २०१९ रोजी नालासोपारा मतदार संघातून शर्मा यांनी नशीब आजमावले होते पण त्यात त्यांना यश आले नव्हते. (Pradeep Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community