बिपिन चंद्र पाल (Bipin Chandra Pal) हे स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचं नाव. लहानपणी आपण लाल-बाल-पाल असा शब्दप्रयोग ऐकला असेल त्यातील पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८५८ रोजी हबीबगंज जिल्ह्यात झाला. आता हा प्रदेश बांगलादेशात आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र आणि आईचे नाव नारायणी देवी.
बंगालच्या फाळणीला तीव्र विरोध केलेला
बिपिन चंद्र पाल (Bipin Chandra Pal) राष्ट्रवादी नेता तर होतेच, त्याचबरोबर शिक्षक, लेखक, पत्रकार देखील होते. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण फारसी भाषेत झालं. ग्रॅज्युएट पूर्ण करण्यापूर्वी त्यांना कॉलेज सोडावं लागलं आणि ते कोलकोताच्या एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करु लागले. विधवा विवाह इत्यादी सामाजिक चळवळींमध्येही त्यांचा पुढाकार होता. ते आधुनिक विचारांचे होते. त्या काळी स्वातंत्र्य चळवळीत जहाल आणि मवाळ असे दोन महत्वाचे गट होते. बिपिनचंद्र पाल हे जहाल गटातले होते. त्यांनी १९०५ रोजी बंगालच्या फाळणीला तीव्र विरोध केला होता. त्यांनी उपोषण, संप, ब्रिटिश उत्पादनांवर बहिष्कार असे मार्ग अवलंबले.
(हेही वाचा Golden Rashi Bhavishya : व्यक्तिगत आयुष्याच्या विकासासाठी राशी भविष्याचा कसा लाभ करून घ्याल?)
विदेशी उत्पादनामुळे भारतीय उत्पादनाला न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. तसंच भारत ही पूर्वीपासूनच मोठी बाजारपेठ होती. जर ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावायचा असेल तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला पाहिजे. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिन चंद्र पाल (Bipin Chandra Pal) या तिघांनी मिळून ब्रिटिश सत्तेला दणका दिला होता. या तिघांनीही देशाचे राष्ट्रीय नेतृत्व केले आहे. विदेशी कपड्यांचा बहिष्कार ही केवळ राजकीय खेळी नव्हती तर वैयक्तिक आयुष्यातही ते या उत्पादनांचा आणि कपड्यांचा बहिष्कार करायचे. आधी केले मग बोलले या प्रमाणे त्यांनी कार्य केले आहे.
स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक होते
बिपिन चंद्र पाल हे स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक होते. २० मे १९३२ रोजी ते हे जग सोडून निघून गेले. इंडियन नॅश्नॅलिज्म, स्वराज ऍंड द प्रेजेंट सिचुएशन, द बेसिस ऑफ रिफार्म, द सोल ऑफ इंडिया, द न्यू स्पिरिट असे अनेक लेखन त्यांनी केले आहेत. तसेच पारदर्शक, बंगाल पब्लिक ऑपिनियन, लाहौर ट्रिब्यून, स्वराज, हिंदू रिव्ह्यू अशा नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community