Home Remedies : पाल आणि झुरळांपासून सुटका हवी; करा ‘हे’ घरगुती उपाय

246
Home Remedies : पाल आणि झुरळांपासून सुटका हवी; करा 'हे' घरगुती उपाय

घरात तुम्ही कितीही साफ-साफाई केली तरी, काना-कोपऱ्यात कीडा-मुंगी लागतेच. (Home Remedies) त्यात पाल आणि झुरळांचे प्रमाण जास्त असते. या किड्यांमुळे आपल्या आरोग्याला धोका असतो. त्यामुळे आपल्याला बरेच आजारही होतात. या लेखात आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, जे करून तुम्ही घरात असलेल्या किड्यांचे निवारण करू शकाल.

१. काळी मिरी

काळी मिरी ही सहसा जेवणात वापरली जाते; पण काळी मिरी ही पाल आणि झुरळांना घरातून बाहेर काढण्यात मदत करते. सगळ्यात आधी काळी मिरी ठेचून घ्या, त्याची पावडर करून घ्या. काळी मिरी पावडर पाणी आणि साबणात मिसळून एका बाटलीत ठेवा. त्याचा वापर ‘स्प्रे’सारखा करा. जिथे पाल आणि झुरळ दिसतील, तिथे हे पाणी स्प्रे करा. (Home Remedies)

(हेही वाचा – Pradeep Sharma : शिवसेना उमेदवाराच्या विरोधात लढणार एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा)

२. कॉफी पावडर 

झुरळाला बरेच लोक घाबरतात. आपल्या जेवणाजवळ झुरळं फिरत असतील, तर ते कोणालाही आवडत नाही. त्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी झुरळांचा घरातून बाहेर काढणे गरजेचे आहेत. कॉफी पावडरच्या वापराने किड्यांमुळे झालेला चिकट भाग लगेच साफ होतो. त्यासाठी सगळ्यात आधी पाण्यात कॉफी पावडर मिसळून ते एका कोपऱ्यात ठेवा. या वासाने सगळी झुरळे घरातून बाहेर पडतील.

३. बेकिंग पावडर 

बेकिंग पावडर आणि साखर एका बाउलमध्ये मिसळून ठेवा. मग त्यात पाणी टाका. आता ते मिश्रण कानाकोपऱ्यात स्प्रे करा. साखरेच्या वासाने झुरळ जवळ येतील आणि बेकिंग पावडर खाऊन मारतील. (Home Remedies)

४. लसूण आणि कांदा

लसूण आणि कांद्याच्या वासाने झुरळ लांब पाळतात. कांद्याच्या वासाने झुरळ मरतात. त्यामुळे हे मिश्रण खूप फायदेशीर ठरते. (Home Remedies)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.