उबाठाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचा संबंध जोडण्यात आलेले दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. हे रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आले असल्याचा दावा करत इडीने त्यावर जप्तीची कारवाई केली होती.
या आधी मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडीकडून साई रिसॉर्ट (Sai Resort) वर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्यात आली होती. सीरआरझेड कायद्याचे उल्लंघन करून या रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. रिसॉर्टच्या बांधकामासाठी मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने न्यायालयाने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.
ईडीने जवळपास 10.20 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. यामध्ये 2 कोटी 73 लाख 91 हजार रुपये किमतीची जवळपास 42 गुंठे जमीन आणि 7 कोटी 46 लाख 47 हजार रुपये किमतीचे रिसॉर्ट याचा समावेश होता.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचे हे साई रिसॉर्ट आहे. या प्रकरणी अनिल परब यांना तूर्तास उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण आहे. तर, सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community