Fake Online Shopping App : सावधान! दिवाळीसाठी ऑनलाईन खरेदी करत असाल तर ‘ही’ गोष्ट जाणून घ्या

मुंबई पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा

158

सध्याच्या काळात बहुतांश माणसं स्वतः बाजारात जाऊन खरेदी (Fake Online Shopping App) करणं टाळतात आणि घरबसल्या आपल्याला हव्या त्या गोष्टी ऑनलाईन मागवतात. डिजिटल पेमेंट आणि इतर अनेक व्यवहारांमध्ये आपला देश पुढे जात असला तरीही यासर्व प्रकारात फसवणुकीचे प्रकारही अधिक वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटरवरून “या दिवाळीत (Fake Online Shopping App) ऑनलाईन खरेदी करताना खऱ्याची आणि खोट्याची जाण ठेवा. अधिकृत संकेतस्थळांची खात्री करून स्वतःला फसवले जाण्यापासून थांबवा.” असा संदेश दिला आहे.

(हेही वाचा – Angelo Mathews Timed Out : टाईम्ड आऊट दिल्यानंतर अशी होती अँजेलो मॅथ्यूजची प्रतिक्रिया)

मुंबई पोलिसांकडे सध्या खोट्या ऑनलाईन (Fake Online Shopping App) अॅपबाबत अनेक तक्रारी येत आहेत. अशातच पोलिसांनी सांगितले की आजच्या युगात लोक मुख्यतः गुगल पे, पेटीएम, अॅमेझॉन पे, फोनपे सारख्या अॅप्समधून डिजिटल पेमेंट करतात, त्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की आता इंटरनेटच्या (Fake Online Shopping App) जगात एकसारख्या नावांचे अनेक बनावट अॅप्स आले आहेत. आणि हे खोटे अॅप्स आपण डाउनलोड करावे यासाठी आपल्या फोनवर सतत नोटिफिकेशन्स येत राहतात. मात्र अशा कुठल्याही नोटिफिकेशनवर क्लीक करण्यापूर्वी ती लिंक तपासून घेणे गरजेचे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.