-
ऋजुता लुकतुके
ऑनलाईन पैसे हस्तांतरणाचा सोपा मार्ग आहे युपीआयने पैसे देणे. पण, यात काहीवेळा नजरचूकही होऊ शकते. एखाद्या क्रमांकावर चुकून पैसे गेले असतील तर ते परत कसे मिळवायचे बघूया… (UPI Payment)
युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात, युपीआयमधून चुकून कुणाला पैसे दिले गेले असतील तर तुम्ही किती लवकर ते परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करता यावर बरंच अवलंबून आहे. काही वेळा समोरच्या व्यक्तीने ते जमा करून घेतलेले नसतात आणि मग सोप्या पद्धतीने तुम्ही ते परत मिळवू शकता. पण, समोरच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर काय कराययं आणि अशावेळी पैसे मिळायची शक्यता किती ते आता बघूया… (UPI Payment)
पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले असतील तर त्या व्यक्तीने तुम्हाला पैसे परत द्यायला हवेत. नाहीतर काही वेळा युपीआय व्यवहार रिव्हर्स करून म्हणजेच उलटा फिरवून तुम्ही पैसे परत मिळवू शकता. व्यवहार कधी फिरवता येईल ते आधी बघूया… (UPI Payment)
१. तुम्ही चुकीचा आयडी किंवा चुकीच्या क्रमांकावर पैसे हस्तांतरित केले असतील तर हा व्यवहार तुम्हाला फिरवावा लागले. (UPI Payment)
२. तुमच्या संमतीशिवाय म्हणजेच अधिकृत परवानगी शिवाय पैसे तुमच्या खात्यातून युपीआय मार्फत गेले असतील, तर तुम्ही ते परत मिळवू शकता. (UPI Payment)
३. तुम्ही आर्थिक घोटाळ्याला बळी पडले असाल, तर पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. (UPI Payment)
४. तुम्ही करत असलेला व्यवहार तांत्रिक दृष्ट्या पार पडलाच नाही, तरीही पैसे खात्यातून वजा झाले, तर तुम्ही पैसे परत मिळवू शकता. (UPI Payment)
(हेही वाचा – Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाच्या फेसबुक ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल)
आता प्रश्न आहे की, पैसे परत मिळवायचे कसे?
१. बँकेशी संपर्क करा : सगळ्यात आधी तुम्ही तुमची बँक आणि युपीआय ॲपच्या ग्राहक सेवेला कळवून पैसे चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित झाल्याची कल्पना द्यायला हवी. अनेकदा बँक किंवा ॲपच तुम्हाला पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सांगू शकतात. (UPI Payment)
२. पुढील हालचाल त्वरित करा : पैसे चुकीच्या पद्धतीने खात्यातून गेल्यावर जितक्या लवकर तुम्ही कारवाई कराल तितकं चांगलं. कारण, पैसे दुसऱ्या खात्यात जमा व्हायला कधी कधी वेळ लागतो. अशावेळी ते परत मिळवणं सोपं जातं आणि पैसे जरी दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात गेले तरी कारवाई त्वरित सुरू होणं आवश्यक आहे. (UPI Payment)
३. बँकेचा तक्रार निवारण अधिकारी : बँका तसंच इतर वित्तीय संस्थांबद्दल तसंच वित्त विषयक सेवा देणाऱ्या ॲपबद्दल ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर त्यांच्या निवारणासाठी रिझर्व्ह बँकेनं एक तक्रार निवारण अधिकारी नेमला आहे. त्याच्याकडे तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. बँक सहकार्य करत नसल्यास आणि पैसे परत मिळण्यात विनाकारण विलंब होत असेल तर हा अधिकारी १५ दिवसांच्या आत तुमच्या शंकेचं निरसन करू शकतो. तसं बंधनच या अधिकाऱ्यावर आहे. (UPI Payment)
४. NPCI ला संपर्क करा : NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. या संस्थेचं नियंत्रण युपीआय मार्फत होणाऱ्या व्यवहारांवर असतं. पैसे परत मिळवण्याच्या प्रक्रियेत काही अडचणी येत असतील तर तुम्ही एनपीसीआयला संपर्क करू शकता. (UPI Payment)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community