-
ऋजुता लुकतुके
वेस्ट इंडिजचा फिरकीपटू ३५ वर्षीय सुनील नरेनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २०१९ पासून ते विंडिज संघापासून दूर आहे.
वेस्ट इंडिजचा माजी फिरकीपटू सुनील नरेनने ८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. २०१९ मध्ये तो राष्ट्रीय संघाकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता.
‘मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर करत आहे. चार लोकांमध्ये खूप बोलण्याचा माझा स्वभाव नाही. पण, खाजगी आयुष्यात, काही लोकांचा खंबीर पाठिंबा आणि प्रोत्साहन याच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो आहे. माझा देश वेस्टइंडिज आणि या साथ देणाऱ्या लोकांचा आज मी ऋणी आहे,’ असं सुनीलने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
View this post on Instagram
२०११ मध्ये सुनील नरेन वेस्ट इंडिजकडून पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर बरीच वर्षं तो संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज होता. वेस्ट इंडिजकडून ते ६ कसोटी, ६५ एकदिवसीय आणि ५१ टी-२० सामने खेळला. २०१२ मध्ये विंडिज संघाने टी-२० विश्वचषक जिंकला, त्यातही सुनीलची कामगिरी मोलाची होती. त्याने स्पर्धेत ९ गडी बाद केले होते.
(हेही वाचा – BMC : सोने-चांदी वस्तू बनवणाऱ्या व्यावसायिकांच्या कारखान्यांवर कारवाई; चार भट्टी, धुराडे हटवले)
२०१४ चा वर्ल्ड टी-२० चषकही तो विंडिजकडून खेळला. २०१२ पासून तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्स संघाकडून खेळतोय आणि या संघाचा तो अविभाज्य भाग आहे. आताही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी लीग क्रिकेट तो खेळतच राहणार आहे. आयपीएल बरोबरच तो कोलकाता संघाच्या इतर फ्रँचाईजी संघांकडूनही खेळतो. तसंच कॅरेबियन लीग आणि बिगबॅश लीगमध्येही तो खेळतो.
२०१४ साली त्याचं गोलंदाजीचं तंत्र सदोष असल्याचा ठपका त्याच्यावर बसला आणि त्यामुळे २०१५ चा एकदिवसीय विश्वचषक तो खेळू शकला नाही. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा सहभाग अनिश्चित होत गेला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community