पुण्यात (Pune) साखळी बाँम्बस्फोट करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. आयसिसच्या महाराष्ट्र गटातील दहशतवाद्यांना सिरीयातून याबाबतच्या सूचना मिळाल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली.
दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात कारवाया करण्याचा कट रचला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात दहशतवाद्यांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोहम्मद शाहनवाज आलम (रा. हजारीबाग, झारखंड) याला नुकतीच अटक केली. एनआयएने सहा दिवसांपूर्वी कोढव्यातू पसार झालेला दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम उर्फ शफिकूर रहमान आलम याला अटक केली. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. आलमला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आलमची एनआयच्या पथकाने चौकशी केली. तेव्हा पुण्यात साखळी बाँम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. याबाबत सिरीयातून सूचना मिळाल्याची माहिती त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना चौकशीत दिली.
(हेही वाचा – Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटलांना नेमके काय हवे? वाचा सविस्तर…’या’ प्रश्नाचे उत्तर )
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (रा. पडघा, जि. ठाणे ) अशी आरोपपत्र दाखल केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (UAPA), स्फोटके तयार करणे, बाळगणे (एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स ॲक्ट) तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात कारवाया करण्याचा कट रचला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात दहशतवाद्यांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले. पुण्यातील महत्त्वाच्या लष्करी संस्थांच्या परिसराचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले होते तसेच इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आलम यांना अटक करण्यात आली होती. हे तिघेही दहशतवादी आयसिसच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. महाराष्ट्र, गोवा, तेलंगणात आयसिसच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते.
हेही पहा –