नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच NATO ने शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियन (आता रशिया) सोबत केलेला शीतयुद्ध सुरक्षा करार रद्द केला आहे. (Suspension Cold-War Treaty) शीतयुद्धाच्या काळात ज्या देशांमध्ये वाद होते, त्यांनी आपापसांत सीमा ठरवल्या पाहिजेत आणि त्याबाबत कोणत्याही प्रकारचा लष्करी संघर्ष होऊ नये, हा सर्वांत महत्त्वाचा उद्देश होता.
रशियाने मंगळवारी या करारातून माघार घेण्याची घोषणा केली. त्यापूर्वीच जूनमध्ये रशियाने या कराराला आता काही अर्थ नसल्याचे स्पष्ट केले होते. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात अमेरिका आणि त्याचे सहयोगी नाटो देश युक्रेनला लष्करी मदत करत होते. या करारालाच मुळात ‘कन्व्हेंशनल आर्म्ड फोर्स इन युरोप’ असे म्हणतात. यामध्ये शस्त्र नियंत्रण, पारदर्शकता आणि नियम आधारित आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणे समाविष्ट आहे. रशिया आणि नाटो यांनी 1990 मध्ये या करारावर स्वाक्षरी केली होती. नाटोचे सर्व 31 सदस्य या कराराचा भाग होते. (Suspension Cold-War Treaty)
नाटो सदस्य गृहीत धरत होते की, रशिया कधीही या करारातून माघार घेण्याची अधिकृत घोषणा करू शकतो. त्यामुळे मंगळवारी दुपारी रशियाने हे करताच काही तासांनंतर नाटोनेही हा करार स्थगित केल्याची घोषणा केली. मे महिन्यात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये या करारापासून वेगळे होण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आता त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. 2007 मध्ये आणि पुन्हा 2015 मध्ये देखील रशियाने हा करार स्थगित केला होता. नंतर ते मागे घेण्यात आले. (Suspension Cold-War Treaty)
रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरू आहे. नाटो सदस्य युक्रेनला उघडपणे पाठिंबा देत आहेत. याचे कारण म्हणजे अमेरिकेला कोणत्या ना कोणत्या प्रकारे युक्रेनला नाटोचा भाग बनवायचे आहे आणि तिथे सैन्य तैनात करायचे आहे. पाश्चात्य देश या कराराचे उल्लंघन करत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. ‘आम्ही वाटाघाटीचे दरवाजे खुले ठेवले होते, जेणेकरून युरोपमध्ये शस्त्रास्त्र नियंत्रण करता येईल, याचा फायदा विरोधकांना घेता आला नाही’, असे निवेदन माॅस्कोने दिले आहे. (Suspension Cold-War Treaty)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community