मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आलेली कामे अद्यापही पूर्ण झालेली नाही. परंतु जी कामे या पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाची झालेली आहे. माहिममधील भगत गल्लीतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट असून जे काम पूर्ण झाले आहे, तेही निकृष्ट दर्जाचे झाल्याने नक्की काँक्रिटीकरणाची कामे ही टिकावू रस्त्यांसाठी होता की बिकावू कंत्राटदारांसाठी होतात असा प्रश्न निर्माण होत आहे. (Cement Concrete Road)
मुंबई महापालिकेने मुंबईतील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाद्वारे सीसी मार्गिकांचे व रस्त्यांच्या मजबुतीकरणाची कामांना जानेवारी २०२२ मध्ये मंजुरी दिली. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असताना या कामांना मंजुरी देताना महापालिकेच्या जी उत्तर विभागातील काही रस्त्यांच्या समावेश या कामांमध्ये करण्यात आला होता. यामध्ये माटुंगा पश्चिम येथील भगत गल्लीचा समावेश होता. या भगत गल्लीच्या रस्त्याचे सिमेंटीकरणाचे एका बाजुचे काम मे २०२३ पूर्वी पूर्ण करण्यात आले, तर उर्वरीत रस्त्याचे काम अर्धवट राहिले. परंतु या अर्धवट पूर्ण केलेल्या रस्त्यांचे कामच ग्रेटास हाऊस या परिसरात निकृष्ट दर्जाचे बनले असून पहिल्याच पावसात हा सिमेंट काँक्रिटचा रस्ता वाहून गेल्याचे दिसून आले आहे. (Cement Concrete Road)
मनमाला रोड आणि टी एच कटारिया मार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम देसाई चौकापर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात आली आहे. हेच काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कंत्राटदाराच्या कामांवर शंका उपस्थित होऊ लागली आहे. विशेष म्हणजे याच कंत्राटदाराने माहिम पश्चिम येथील सोनावाला अग्यारी रोडचे सिमेंट काँक्रिटचे काम केले होते, आणि या रस्त्याचेही काम निकृष्ट दर्जाचे बनले होते. त्यामुळे या रस्त्यांचेही काम तोडून पुन्हा बनवण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. (Cement Concrete Road)
(हेही वाचा – Uttar Pradesh: अलीगड शहराचे नाव हरिगड होणार, उत्तर प्रदेश सरकारकडून हिरव्या झेंड्याची प्रतिक्षा)
विशेष म्हणजे यापूर्वी दादर पश्चिम येथील श्री समर्थ मार्ग, अनंत पाटील मार्ग, शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे मार्ग व गोखले मार्ग जोडणारी गॅस गल्ली आदी रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यानंतर आता अग्यारी मार्ग आणि भगत गल्लीच्या रस्त्यांचे सिमेंटीकरणाची कामेही निकृष्ट दर्जाची झाल्याने प्रभाग पातळीवर कंत्राटदार नेमूनही काम योग्यप्रकारे होत नाही. (Cement Concrete Road)
मुंबईतील या कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे सिमेंटीकरणाची कामे होत नसल्याने या रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेने पाच मोठ्या कंत्राटदारांची नेमणूक करून तब्बल ६०८० कोटी रुपयांच्या कामांची कंत्राटे दिली. छोट्या कंत्राटदारांच्या कामांबाबत तक्रारी येत असल्याने तसेच त्यांच्याकडून योग्यप्रकारे कामे होत नसल्याने मोठ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या रस्त्यांची निकृष्ट रस्त्यांची कामे पहाता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासकांना निर्देश देत पाच मोठ्या कंत्राटदारांकडूनच ही कामे करून घेत कामांचा दर्जा राखण्याचा प्रयत्न केला आहे. (Cement Concrete Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community