Remedy For Cold : थंडीत फाटलेल्या ओठांसाठी रामबाण उपाय

204
Remedy For Cold : थंडीत फाटलेल्या ओठांसाठी रामबाण उपाय

काही लोकांना तूप खायला आवडत नाही किंवा त्याचा वास देखील आवडत नाही, पण जर तुम्ही त्याचे फायदे वाचलेत तर तुम्ही आवर्जून तूप खाल. (Remedy For Cold) या लेखात आम्ही तुम्हाला तूप खाण्यासाठी प्रोत्साहन देणार नाही, तर ओठांवर तूप लावण्याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.

हळद आणि तुपाचे मिश्रण आहे गुणकारी 

कोमल ओठांसाठीचा एक नैसर्गिक उपाय म्हणजे हळद आणि तूप ! एक चमचा तूप आणि चिमूटभर हळद घ्या, दोन्हीचे एकसमान मिश्रण तयार करा आणि मग ओठांवर लावा. तूप ओठांना मोइश्चराईज करते आणि हळद त्वचेवर उपचार करते. हा लेप रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी काढून टाका. तुम्ही हे मिश्रण एका छोट्या बाटलीमध्ये तयार करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा वापरू शकता. (Remedy For Cold)

(हेही वाचा – Karnataka Congress : कर्नाटक कॉंग्रेसची झोप का उडाली ?)

त्वचेचे तेज वाढवते 

दररोज तूप वापरल्याने ओठ गुलाबी रहातात. हळदीमुळे त्वचा काळी पडत नाही उलट अजून उजळते. स्किन आणि लीप केअर प्रॉडक्टमुळे सहसा त्वचा काळी पडते. जर तुमचे ओठ काळे पडले असतील, तर हे मिश्रण तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

लिप बाम किंवा पेट्रोलियम जेलीचा नियमित वापर 

थंडीच्या वेळी आणि विशेषत: थंड हवेत ओठांवर वारंवार लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली लावण्यास अजिबात संकोच करू नका. फेस मास्क वापरू शकता. यामुळे आपले ओठ, तसेच तोंडाभोवती कव्हर होऊन कोरड्या हवेचा परिणामही जाणवणार नाही. (Remedy For Cold)

तुपाऐवजी मधदेखील तितकाच फायद्याचा

जर आपल्याला तूपाची चव किंवा सुगंध अजिबातच आवडत नसेल आणि आपण ते सहन करण्याच्या मूडमध्ये नसल्यास आपण थोडावेळ ओठांवर मधदेखील लावून ठेवू शकता. त्यासाठी मधात चिमूटभर हळद घालून ओठांवर लावा. कमीतकमी 15 ते 20 मिनिटे सोडा, नंतर ते धुवा आणि आवश्यक असल्यास लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली लावा. ओठ साफ करतांना ओठांवरील मृत त्वचा काढून टाकणे सुलभ करण्यासाठी कापसाचा वापर करा. हे आपल्या ओठांना देशी तुपाच्या प्रभावाप्रमाणे मऊ आणि सुंदर बनवेल. (Remedy For Cold)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.