Air Pollution: हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी सरकारकडून ‘या’ मार्गदर्शक सूचना जारी

N-95मास्क आणि N 99 मास्क, कापडी मास्क वापरण्याचे आवाहन

175
Air Pollution: हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी सरकारकडून 'या' मार्गदर्शक सूचना जारी
Air Pollution: हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी सरकारकडून 'या' मार्गदर्शक सूचना जारी

दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता (Air Pollution) खालावत आहे. यामुळे दिल्लीसह मुंबईतील राज्यातील अनेक शहरांमध्ये नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना आरोग्य खात्याने दिल्या आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पनवेल, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांनी हवेच्या प्रदूषणाबाबत कठोर उपाययोजना केली आहे. यामध्ये सकाळचा मॉर्निंग वॉक, सायंकाळचे फिरणे, व्यायाम, धावणे टाळावे, सकाळ-सायंकाळ घराची दारे, खिडक्या बंद ठेवा, असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ तसेच गरोदर माता, लहान मुले, पोलीस, रिक्षाचालक, व्याधींनी त्रस्त व्यक्ती, वाहतूक पोलीस, सफाई कामागार, फेरीवाले यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. N-95मास्क आणि N 99 मास्क, कापडी मास्क वापरावा, अशी माहिती आरोग्य खात्याचे पुणे येथील संचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Mahila Bachat Gat : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन महानगरपालिका मुख्यालयात)

मार्गदर्शक सूचना
– फटाके जाळणे टाळावे
– हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक कोंडीची ठिकाणे, दगडखाणी, कोळशावर आधारित उद्योग, वीटभट्टी, उच्च प्रदूषण असलेले उद्योग, वीज प्रकल्प येथे जाणे टाळावे.
– बंद आवारात डासांच्या कॉईल जाळू नये.
– घारामध्ये साफसफाईच्या वेळी व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करावा.
– एअर प्युरिफायरचा वापर टाळा.
– वाहत्या पाण्यात डोळे धुवा.
– उघड्यावर कचरा किंवा गोवऱ्या जाळू नका.
– सिगारेट, विडी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळा.

स्थानिक स्वराज्य संस्थांना कृती आराखडा
-महिनानिहाय वायू प्रदूषणाची नोंद ठेवा.
-असुरक्षित लोकसंख्येची दस्तऐवजीकरण करा.
– आरोग्य सेवा, आरोग्य कर्मचारी, साधनसामग्री यांची पूर्वतयारी करून ठेवा.
– आरोग्य सेवा, पायाभूत सुविधांची यादी तयार ठेवा.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.