Lifestyle : नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय, बनवा झटपट स्पायसी फ्रेंच टोस्ट

तुम्हाला पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी वेळ नसेल तर फ्रेंच टोस्ट हा खूप चांगला पर्याय आहे.

185
Lifestyle : नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय, बनवा झटपट स्पायसी फ्रेंच टोस्ट
Lifestyle : नाश्त्यासाठी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय, बनवा झटपट स्पायसी फ्रेंच टोस्ट

नाश्ता हा दिवस भरातला सगळ्यात महत्वाचा आहार आहे. आपल्या धावपळीच्या जीवनात आपण नाश्ता करणे टाळतो, ही चांगली बाब नाही. कधीही उपाशी पोटी घरातून बाहेर पडू नये, हे आपल्याला आपले मोठे सांगताच असतात आणि ते खरंच आहे. तुम्हाला पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी वेळ नसेल तर फ्रेंच टोस्ट हा खूप चांगला पर्याय आहे. या लेखात, फ्रेंच टोस्ट कसा बनवायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Lifestyle)

बऱ्याच लोकांना सकाळच्या घाई गडबडीमध्ये, नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही आणि काही जण तेच तेच खाऊन बोर होतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक असा सोप्पा पदार्थ घेऊन आलोय जो सुमारे १० मिनटात बनून तयार होऊ शकतो आणि तो पदार्थ आहे स्पायसी फ्रेंच टोस्ट. चला याच्या रेसिपीकडे वळूयात. (Lifestyle)

(हेही वाचा – Daycare Scheme : राज्यात लवकरच पाळणाघर योजना; नोकरदार महिलांना दिलासा)

स्पायसी फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठीचे साहित्य :

४ ब्रेड स्लाईस

२ अंडी

१ कांदा

१ टोमॅटो

अर्धा चमचा मीठ

४ चमचे दूध

४-५ हिरव्या मिरच्या

तेल किंवा बटर

१ चमचा तिखट

स्पायसी फ्रेंच टोस्ट बनवण्याची पद्धत :

१. हा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी सर्वात आधी कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. (Lifestyle)

२. आता ब्रेडचे दोन भाग करून घ्या. (Lifestyle)

३. त्यानंतर, २ अंडी एका भांड्यामध्ये किंवा बाऊलमध्ये फोडून टाका. आता या अंड्यामध्ये तिखट, मीठ आणि दूध घालून ते चांगल्या प्रकारे फेटून घ्या. (Lifestyle)

४. दुसऱ्या बाजूला पॅन गरम करायला ठेवा. त्यामध्ये बटर किंवा तेल घाला. (Lifestyle)

५. आता दोन्ही ब्रेडचे स्लाईस अंड्याच्या मिश्रणात बुडवून ते बेक करण्यासाठी तव्यावर किंवा पॅनवर ठेवा. (Lifestyle)

६. आता दोन्ही बाजूंनी ब्रेड चांगला शिजवून घ्या. तुमचा मसालेदार फ्रेंच टोस्ट तयार आहे. आता हा टोस्ट, थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्या. (Lifestyle)

७. बाकीचे फ्रेंच टोस्ट याच पद्धतीने बनवून घ्या आणि टोमॅटो केचअप किंवा पुदिना चटणीसोबत गरमागरम फ्रेंच टोस्ट सर्व्ह करा. (Lifestyle)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.