Hawkers Action In Dadar : दादरच्या फेरीवाल्यांवर कारवाई; फेरीवाले एकवटले, स्थानकासमोरच मारला ठिय्या

मुंबईतील दादर परिसरात मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्या असून दिवाळीच्या सणामध्ये खरेदी करणाऱ्यांपेक्षा विकणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या अधिक झाल्याने दादर मधील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली पहायला मिळत आहे.

198
Hawkers Action In Dadar : दादरच्या फेरीवाल्यांवर कारवाई; फेरीवाले एकवटले, स्थानकासमोरच मारला ठिय्या
Hawkers Action In Dadar : दादरच्या फेरीवाल्यांवर कारवाई; फेरीवाले एकवटले, स्थानकासमोरच मारला ठिय्या

मुंबईतील दादर परिसरात मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्या असून दिवाळीच्या सणामध्ये खरेदी करणाऱ्यांपेक्षा विकणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या अधिक झाल्याने दादर मधील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली पहायला मिळत आहे. या वाढत्या फेरीवाल्यांचा त्रास स्थानिकांसह या ठिकाणी खरेदीला येणाऱ्या लोकांनाही होत आहे. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मंगळवारी महापालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. ऐन दिवाळीच्या सणात पोलीस आणि महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईचा निषेध म्हणून सर्व फेरीवाल्यांनी दादर रेल्वे स्थानकासमोर तब्बल तीन तास ठिय्या मारत आंदोलन केले. अखेर सर्व सूत्रे हलल्यानंतर दिवाळीपर्यंत या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली जावी, असा तोडगा काढण्यात आल्यानंतर या फेरीवाल्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि पुन्हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. (Hawkers Action In Dadar)

मंगळवारी दादर पश्चिम परिसरातील रानडे मार्ग आणि जावळे मार्ग येथील फेरीवाल्यांवर पोलीस आणि महापालिका यांच्या माध्यमातून कारवाई हाती घेण्यात आली. सकाळी डिसिल्वा रोड वरील सर्व फेरीवाल्यांचे व्यवसाय सुरू होते. मात्र रानडे मार्ग आणि जावळे मार्गावरील फेरीवाल्यांवरील कारवाई जोरात सुरू होती. त्यामुळे एकाच दादरमध्ये कारवाईच्या या दुजा भावमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान डिसिल्वा रोड वर सुरू असलेल्या या फेरीवाला व्यवसायाची दखल घेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या कारवाईचा निषेध म्हणून या भागातील सर्वच फेरीवाल्यांनी दादर पोलीस ठाण्याची चौकी असलेल्या केशव सुत उड्डाणपूल व सुविधा दुकानात समोरील जागेत आंदोलन केले. मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता सुरू केलेलं हे आंदोलन सायंकाळी साडेसहा ते सात पर्यंत सुरू होते. (Hawkers Action In Dadar)

(हेही वाचा – Air Pollution: हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी सरकारकडून ‘या’ मार्गदर्शक सूचना जारी)

अखेर या आंदोलनामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची पोलिसांना दखल घ्यावी लागली आणि त्यांनी त्यांची समजूत काढून हे आंदोलन मागे घ्यायला लावले. मिळालेल्या माहितीनुसार, शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे याबाबत तक्रार गेल्यानंतर त्यांनी दिवाळी पर्यंत या गरीब फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मुभा देण्यात यावी आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना पोलीस व महापालिका आयुक्त यांना केल्यानंतर, त्यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी हा सुवर्ण मध्य काढला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, व्यवसाय करण्यास मुभा देताना रस्त्यावर कोणी व्यवसाय करणार नाही याची काळजी घेतली जावी अशाही सूचना पोलिसांनी त्यांना दिल्याचे बोलले जात आहे. (Hawkers Action In Dadar)

फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार जर महापालिका आणि पोलीस यांना जर कारवाई करायची होती, तर मग दिवाळी पूर्वी एक महिना आधीपासून करायला हवी होती. म्हणजे आम्ही दिवाळी करता कोणत्याही प्रकारचे सामान खरेदी केलं नसतं. जेणेकरून आमचा व्यवसाय करण्यास बंदी घातल्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळता आलं असतं. पण दिवाळी करता व्याजाने पैसे घेवून सामान खरेदी केल्यानंतर ही कारवाई योग्य नसून पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या तोडपाणी करताच ही कारवाई असते की काय अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. (Hawkers Action In Dadar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.